लसीकरणातील डेटा ऑपरेटर्सना पगार मिळेना

लसीकरणातील डेटा ऑपरेटर्सना पगार मिळेना

काम बंद करण्याचा इशारा

औरंगाबाद - Aurangabad

महापालिकेने (Corona vaccine) कोरोना लसीकरणासाठी 120 डेटा ऑपरेटरची (Data operator) कंत्राटी पद्धतीने भरती केली आहे. या कर्मचार्‍यांचा मागील पाच पहिन्यापासून पगार थकलेला आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचार्‍यांनी महापालिका कार्यालयात (Municipal Office) जमा होत अतिरिक्त आयुक्त बी. बी नेमाणे यांना निवेदन दिले.

शहरातील सर्व लसीकरण केंद्रावरील (Vaccination Center) डेटा ऑपरेटर पालिका कार्यालयात आल्याने लसीकरण केंद्रांवर काम बंद होते. दुपारी दीड वाजेनंतर ते सुरू झाले. पुढील दोन दिवसात पगार दिला नाही तर काम बंद करण्याचा इशारा या कर्मचार्‍यांनी पालिकेला दिला आहे. केंद्र सरकारने देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, पालिकेने शासन निर्देशानुसार लसीकरणाची जम्बो मोहीम हाती घेत 115 केंद्र सुरू केले. त्यासारूठी एप्रिल महिन्यात 120 डाटा ऑपरेटरची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली. कर्मचार्‍यांनी सांगितले की, आमची भरती ही गॅलक्सी नावाच्या एजन्सीकडून करण्यात आल्याचे आजच आम्हाला कळाले आहे. या पदासाठी दरमहा साडेनऊ हजार रुपये मानधन देण्याचे ठरले होते. मात्र अजून एकाही महिन्याचे मानधन मिळालेले नाही.

लसीकरणाच्या वेळी आलेल्या प्रत्येकांची अ‍ॅपवर नोंदणी करण्याचे काम हे डेटा ऑपरेटर करतात. दरम्यान, गुरुवारी पालिकेच्या सभागृहात प्रत्येक लसीकरण केंद्रावरील एक डॉक्टर, एपीडब्ल्यु कर्मचारी आणि शिक्षकांना डेटा आपलोड करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी बोलावण्यात आल्याचे याच कर्मचार्‍यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे आमचे काम राहील की नाही, याबाबत चिंता वाटू लागल्याने हे सर्व डेटा ऑपरेटर पालिकेत आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com