धक्कादायक... वेबसाईट हॅक करून 16 जणांना दिले व्हॅक्सिनेशन प्रमाणपत्र!

दहा जणांची चौकशी सुरू
धक्कादायक... वेबसाईट हॅक करून 16 जणांना दिले व्हॅक्सिनेशन प्रमाणपत्र!

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना प्रतिबंधक लस न (Corona vaccine) घेताच लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेबसाइट हॅक (Website hacked) केल्याच्या प्रकारामुळे महापालिकेला चांगलाच हादरा बसला आहे. एकाच कुटुंबातील तब्बल 16 जणांची नावे वेबसाइटमध्ये घुसवण्यात आली आहे. याप्रकरणी पालिकेच्या चौकशी पथकाने 10 जणांची चौकशी केली. तर दुसरीकडे पोलिसांनीही चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या कारवाईकडे आमचे लक्ष असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस मंडलेचा (Dr. Paras Mandale) यांनी सांगितले.

शहरातील पालिकेच्या आरेफ कॉलनी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत डीकेएमएम लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. या केंद्रांवर 29 ऑगस्ट रोजी एकाच कुटुंबातील 16 जणांनी प्रत्यक्ष लस न घेता वेबसाईट हॅक करुन नावे घुसडवण्यात येवून लस घेतल्याचे भासवण्यात आले. लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र लस न घेता मिळवण्याचा हा प्रकार समोर आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाला चांगलाच हादरा बसला. डीकेएमएम लसीकरण केंद्रावरील डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data entry operator) च्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्यासाठी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी तीन आरोग्य अधिकार्‍यांची समिती तयार केली. त्यात डॉ. मेघा जोगदंड, डॉ. मनिषा भोंडवे, डॉ. हेमंत राठोड यांचा समावेश आहे.

डॉ. मंडलेचा यांनी देखील सोमवारी लसीकरण केंद्रावर जावून तेथील कर्मचार्‍यांची चौकशी केली. दरम्यान, लस न घेता लस घेतल्याचे भासवून तसे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी यापूर्वी देखील असे प्रकार लसीकरण केंद्रांवर घडले आहेत का? असे डॉ. मंडलेचा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, डीकेएमएम केंद्रावरचा घडलेला प्रकार हा पहिलाच प्रकार आहे. या प्रकारामुळे आम्ही देखील सतर्क झालो आहोत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com