सकाळ, संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरा

महावितरणचे ग्राहकांना आवाहन
सकाळ, संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरा

औरंगाबाद - aurangabad

राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे (MSEDCL) महावितरणला विविध स्त्रोतांकडून मागणीच्या तुलनेत कमी वीजपुरवठा (Power supply) होत आहे. यामुळे नाविलाजास्तव (Electricity bill) वीज बिलाची वसुली कमी आणि वीजहानी जास्त असलेल्या काही भागात भारनियमन करावे लागत आहे. वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी विजेच्या सर्वाधिक मागणीच्या वेळी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा. तसेच (LED bulbs, LCD bulbs, solar energy) एलईडी बल्ब, एलसीडी बल्ब, सौर उर्जेचा वापर करणे, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे, सौर उपकरणाचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग झाले आहे. खुल्या बाजारातून मिळेल तेथून बीज विकत घेवून ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच कोयना धोरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्रारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.

विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार वीज बिलाची वसूली कमी आणि वीज हानी अर्थात वीज चोरी जास्त असलेल्या काही भागात नाविलाजास्तव चक्राकार पध्दतीने भारनियमन करावे लागत आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.

कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्‍यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटेकोरपणे करायला हवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.