मे महिन्याच्या मध्यात पुन्हा अवकाळी पाऊस

jalgaon-digital
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

मराठवाड्यात (Marathwada) हजेरी लावल्यानंतर शनिवारी अवकाळी पाऊस काहीसा थांबला आहे. रविवारी सकाळपासून पुन्हा आकाशात ढगांची गर्दी जमली असून वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. येत्या १७ मेनंतर पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्‍यता आहे. 

prajakta mali प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज…

एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे सवाधिक नुकसान झाले आहे. मोसमी पावसावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. मराठवाड्यात सहा मेपर्यंत पावसाने हजेरी लावली होती. वादळासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः पिकांसह  फळबागांना सर्वाधिक फटका बसला आहे. येत्या आठ मेपर्यंत विभागात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. इतर सहा जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, १६ मेपर्यंत थांबलेला पाऊस १७ ते १९ मे दरम्यान पुन्हा परतण्याची शक्‍यता आहे, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.

prajakta mali प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज…

मे महिन्याच्या अखेरीस कोरडे हवामान राहणार आहे. पेरणीसाठी जून महिन्यात मोसमी पावसाची शक्यता असणार आहे. पूर्वमोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. यंदा सरासरोपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे मोसमी पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. सरासरी ९५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असेल, असे हवामान अभ्यासक सांगत आहेत. विभागात गेल्या आठ दिवसांत अवकाळी पावसामुळे पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. विजांसह झालेल्या पावसाने जीवित व वित्तहानी झाली आहे.

मराठवाड्यातील केसर आंबा देशभर प्रसिद्ध आहे. विभागात ३० हजार हेक्‍टरपेक्षा अधिक केसर आंब्याचे क्षेत्र आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने आंब्याची मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. चांगल्या प्रतीच्या आंब्याला तडाखा बसल्याने गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. मे महिन्याच्या मध्यात उपलब्ध होणारा केसर आंबा कमी निघणार आहे. त्यामुळे यंदा केसरचा तुटवडा राहणार असल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले.

prajakta mali प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *