सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात अमर्याद संधी

विशाल ढुमे यांचे प्रतिपादन 
सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात अमर्याद संधी

औरंगाबाद - aurangabad

एकविसावे शतक हे संगणकाचे (Computer) आहे असे आपण सहजपणे बोलून जातो. पण ते खरे आहे. कारण सगळ्याच गोष्टी या संगणकाच्या अखत्यारीत आलेल्या आहेत. नवनवीन तंत्रज्ञान (Technology) या क्षेत्रात दाखल होते. आजघडीला सायबर सिक्युरिटी आणि एथिकल हॅकिंग क्षेत्र (Ethical hacking area) मोठ्या  प्रमाणावर विस्तारात जाणारे क्षेत्र ठरत आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. गडगंज असे पॅकेजेस (Package) या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना मिळतात, असे प्रतिपादन (Cyber ​​cell) सायबर सेल विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे (Deputy Superintendent of Police Vishal Dhume) यांनी केले. 

व्हर्सटाईल टेक्नॉलॉजीच्या (Versatile technology) वतीने सायबर सिक्युरिटी आणि एथिकल हॅकिंग या विषयावर जनजागृतीपर कार्यशाळेत ते बोलत होते. (Hotel Grand Modi) हॉटेल ग्रँड मोदी येथे झालेल्या कार्यशाळेत शालेय तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने झाली. यावेळी सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण, विवेककुमार वर्मा, कृष्णा वर्मा तसेच राजेश वर्मा यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यशाळेत आपल्या संगणकाची सुरक्षितता कशी ठेवायची, डिलीट झालेला डेटा कशाप्रकारे परत मिळवायचा, ई कॉमर्स वेबसाईट कशी बनवायची, तिची सुरक्षितता कशा पद्धतीने हाताळायची, इंटरनेटच्या माध्यमातून होणारे बँकिंग फ्रॉड, त्यापासून कसे वाचायचे, एथिकल हॅकिंग म्हणजे काय, सायबर सिक्युरिटी काय असते, दररोजच्या जीवनात छोट्या चुकीमुळे कसे आर्थिक नुकसान होऊ शकते याचेही प्रशिक्षण देण्यात आले. कॅप्चर द फ्लॅग' (सीटीएफ) ही अनोखी स्पर्धा कार्यशाळेच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.

पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे म्हणाले की, व्हर्सटाईल टेक्नॉलॉजीसारख्या खासगी संस्थेने सायबर सेक्युरिटीविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेऊन कौतुकास्पद कार्य केले आहे. याठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी आणि एथिकल हॅकिंगचे प्रशिक्षण दिले जाते ही अतिशय चांगली गोष्ट आहे. ज्याप्रमाणे संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अपडेट ठेवायला लागते अगदी त्याचप्रमाणे आपले नॉलेज देखील अपडेट असणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात आपल्या परिसरातील नागरिकांची आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षितता ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. ऑनलाईन फसवणुकीत असंख्य लोक देशोधडीला लागतात हे आपण बघतो. त्यामुळे ही फसवणूक कशी टाळावी याचे ज्ञान मिळवणे आवश्यक आहे.

आजकालच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या असंख्य टोळ्या वाढत असल्या तरी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. दररोज ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या पेपरमध्ये झळकत असताना देखील लोक आमिषाला बळी पडतात. फसवणूक करणाऱ्या टोळ्या नवनवीन शक्कल लढवून हे काम करतात. त्यामुळे प्रत्येकानेच सतर्क राहायला हवे. आम्ही सायबर पोलिसांच्या वतीने वेळोवेळी महाविद्यालयांमध्ये शिबिरांच्या माध्यमातून जनजागृतीपर मोहीम सातत्याने राबवत असतो, असे सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी नमूद केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत विवेककुमार वर्मा यांनी तर आभार कृष्णा वर्मा यांनी मानले.

Related Stories

No stories found.