Friday, April 26, 2024
HomeUncategorizedएसबीआयच्या निवृत्त लेखापालाची फसवणूक

एसबीआयच्या निवृत्त लेखापालाची फसवणूक

औरंगाबाद – Aurangabad

क्रेडिट कार्ड कस्टमर केअरमधून (Credit Card Customer Care) बोलत असल्याची थाप मारुन तुमचे बंद पडलेले कार्ड सुरु करायचे आहे का? असे म्हणत परप्रांतीय भामट्याने एसबीआयच्या (SBI) निवृत्त लेखापाल वृद्धेला सव्वा लाखाचा गंडा घातला. विशेष म्हणजे, या भामट्याने वृध्देला तिच्या खात्याची व क्रेडिट कार्डची इत्यंभूत माहिती सांगितली. त्यामुळे त्याच्यावर वृद्धेचा विश्वास बसला. मात्र, त्या वृध्देने नंतर कार्ड सुरु करते, असे सांगूनही भामट्याने कार्डवरून 1 लाख 22 हजार स्वत:च्या खात्यावर वळते केले.

- Advertisement -

26 एप्रिल रोजी एन-4, सिडको भागात हा प्रकार घडला. गौरव कुमार वर्मा (रा. सी-2, सत्यनगर, जयपुर) असे या भामट्याचे नाव असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. टाऊन सेंटर येथील एसबीआय बँकेतून (SBI Bank) निवृत्त झालेल्या शालिनी गोपाल चांदवाणी (67, रा. बी-विंग, ब्यू बेल हाऊसिंग सोसायटी, प्रोझोन मॉलच्या बाजूला) यांच्याकडे बँकेचे व्हिसा क्रेडिट कार्ड आहे. त्यांना 1 लाख 22 हजार रुपयांच्या खर्चाची मर्यादा आहे. मात्र कित्येक दिवस कार्ड न वापरल्याने ते बंद झाले.

दरम्यान, 26 एप्रिल रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास शालिनी यांना गौरव कुमार या भामट्याने मोबाइलवर संपर्क साधला. त्यावेळी त्याने ((Credit Card) क्रेडिट कार्ड कस्टमर केअरमधून बोलतोय असे सांगून, तुमचे क्रेडिट कार्ड बंद झालेले आहे. ते पुन्हा सुरु करण्यासाठी खात्याची माहिती विचारली. तेव्हा शालिनी यांनी त्याला सध्या कोरोनामुळे क्रेडिट कार्ड बंद असून नंतर सुरु करेल, असे सांगितले. मात्र, भामट्याने शालिनी यांची सर्व माहिती सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. सर्व माहिती बरोबर आहे का? असे विचारल्यामुळे शालिनी यांनी खरी असल्याचे सांगितले. त्यानंतर भामट्याने पुन्हा शालिनी यांना बचत खात्याची व डेबिट कार्डची माहिती विचारली. त्यामुळे शालिनी यांना संशय आला. त्यांनी तात्काळ एसबीआयच्या क्रेडिट कार्ड कस्टमर केअरला संपर्क साधून कार्डच्या मर्यादेबाबत विचारणा केली. तेव्हा कस्टमर केअरमधील कर्मचार्‍याने त्यांना 1 लाख 22 हजार रुपयांची मर्यादा असल्याचे सांगत आत्ताच तुम्ही सर्व पैसे खर्च केल्याचे कळविले. हे ऐकून शालिनी यांना धक्का बसला. त्यांनी मी पैसे खर्च केले नसल्याचे सांगितले.

शालिनी यांची कोणतीही परवानगी नसताना त्यांचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात आले. फसवणुक झाल्याचे कळताच तक्रार दिल्याचेही शालिनी यांनी सांगितले. त्यावरुन आता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शालिनी यांनी थेट सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. शालिनी यांची रक्कम गौरव कुमार वर्माच्या खात्यावर वळती झाल्याचे उघड झाल्यावरुन अखेर गुरुवारी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

शालिनी या क्रेडिट कार्ड वापरात नसल्याने अनेक दिवसांपासून ते बंद होते. विशेष म्हणजे, बंद पडलेल्या कार्डबाबत भामट्याला संपूर्ण माहिती कशी मिळाली? शालिनी यांच्याबाबत सर्व माहिती भामट्याकडे कशी काय होती? त्यामुळे एसबीआय कार्डचे कर्मचारी आणि भामटा यांच्यात मिलीभगत असल्याचा दावा शालिनी यांनी तक्रारीत केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या