'मशाल' निशाणी समता पार्टीचीच!

'उबाठा'पुढे नवे संकट
'मशाल' निशाणी समता पार्टीचीच!

छत्रपती संभाजीनगर- 'मशाल' ही निवडणूक निशाणी आमचीच होती, आहे आणि राहणार असा दावा करत भविष्यातील सर्व निवडणुका आम्ही 'मशाल'वरच लढणार आहोत, असे समता पार्टीने स्पष्ट केले. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नव्याने पक्ष चिन्ह घ्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. 

समता पार्टी येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. 'मशाल' चिन्ह आमचे असून यावर ३१ ऑगस्ट रोजी निर्णय होण्याची शक्‍यता आहे. याच चिन्हावर आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी सांगितले.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाला शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह मिळाले. तर उद्धव ठाकरे यांनी 'मशाल' चिन्ह आपले असल्याचे सांगितले. मात्र, हे चिन्ह समता पार्टीचे असून जॉर्ज फर्नांडीस, नितीशकुमार यांनी या चिन्हावर निवडणिका लढवत मंत्री पदे भूषवली आहेत. 'मशाल' हे चिन्ह समता पार्टीचे असून आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. येत्या ३१ ऑगस्ट रोजी 'मशाल' हे चिन्ह समता पार्टीलाच मिळणार आहे. 'मशाल' चिन्हावरच आम्ही सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्याचे देवळेकर म्हणाले. 

उबाठापुढे नवे संकट 

आधी ४० आमदार पक्ष सोडून गेले, नंतर ते सत्तेत गेले, काही दिवसांनी बहुतांश खासदारही सोडून गेले, निवडणूक आयोगाने निकाल देत शिवसेना नाव, पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले. एकंदर परिस्थिती लक्षात घेता आता हातात आलेली 'मशाल' ही निशाणी देखील समता पार्टीकडे गेल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नवे निवडणूक चिन्ह मिळवावे लागणार असे दिसते. 

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com