सीमा भागात नवीन शासकीय मराठी महाविद्यालय सुरू होणार
अन्य

सीमा भागात नवीन शासकीय मराठी महाविद्यालय सुरू होणार

शैक्षणिक वर्ष सन 2021-2022 पासून प्रवेश

Arvind Arkhade

मुंबई : सीमा भागात महाविद्यालये स्थापन करणे तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी पाऊल उचललं जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विद्यापीठाचे उपकेंद्र/नवीन शासकीय मराठी महाविद्यालय लवकर स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष समिती नेमण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात या शासकीय मराठी महाविद्यालयासाठी पाच एकर जमीन उपलब्ध झाल्यानंतर त्याचा बृहत आराखडा तयार करून या महाविद्यालयाला शासन स्तरावरील सर्व मान्यता देण्यात येणार आहे.

पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन 2021-2022 पासून प्रवेश देण्यात येणार आहे. असे उदय सामंत यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com