विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोघा शिक्षकांना कारावास

पाच वर्षांची शिक्षा
विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोघा शिक्षकांना कारावास

औरंगाबाद - aurangabad

महाविद्यालयात आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन शिक्षकांना परिस्‍थितीजन्‍य पुरावे आणि न्‍यायालयात सादर करण्‍यात आलेल्या पुराव्‍यांआधारे पाच वर्षांची सक्तमजुरी आणि विविध कलामांखाली प्रत्‍येकी ४५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए. एस. खडसे (Judge A. S. Khadse) यांनी ठोठावली. विशेष म्हणजे गुन्‍हा दाखल झाल्यानंतर ११ महिन्‍यांतच आरोपींना शिक्षा ठोठावण्‍यात आली आहे.

अनुप दामोधर राठोड (३१, रा. आंबा तांडा, ता. कन्‍नड) आणि संदीप हरीचंद्र शिखरे (३२, रा. जवखेडा (बु), ता. कन्‍नड) अशी आरोपी शिक्षकांची नावे आहेत. या प्रकरणात १७ वर्षीय विद्यार्थिनीने फिर्याद दिली होती. त्यानुसार, १२ फेबु्रवारी रोजी फिर्यादी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयास विद्यापीठातील पथक भेट देणार होते. त्यामुळे महाविद्यालयातील प्रयोगशाळेची साफसफाई करण्यासाठी फिर्यादीच्या वर्गशिक्षकाने फिर्यादीसह तिच्या दोन मैत्रिणींना बोलाविले होते.

त्यानुसार फिर्यादी महाविद्यालयात गेली होती, वर्गशिक्षक प्रयोगशाळेची चावी आणण्यासाठी गेले होते, तर तिच्या मैत्रिणी झाडू आणण्यासाठी गेल्या होत्या. ही संधी साधत वरील दोघे शिक्षक तेथे आले आणि त्यांनी फिर्यादीशी अश्‍लील चाळे करीत तिचा विनयभंग केला. फिर्यादीने या घटनेची माहिती वर्गशिक्षक आणि प्राचार्यांना दिली. या प्रकरणात कन्‍नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना १६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली. तेव्‍हापासून दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

गुन्‍ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्‍यात आल्यानंतर खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी एक तर अरविंद बागुल सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. विशेष म्हणजे सुनावणी सुरू असतांना फिर्यादीच फितुर झाली. मात्र, न्‍यायालयाने परिस्‍थितीजन्‍य पुरावे आणि न्‍यायालयात सादर करण्‍यात आलेल्या पुराव्‍यांआधारे दोघा आरोपी शिक्षकांना दोषी ठरवले. दोघा आरोपी शिक्षकांना भादंवि कलम ३५४ आणि पोक्सोच्‍या कलम ८ व १२ अन्‍वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी दहा हजार रुपये दंड आणि पोक्सोच्‍या कलम १० अन्‍वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठा‍वलली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com