Monday, April 29, 2024
HomeUncategorizedउद्धव गटातील आणखी दोन आमदार फुटणार?

उद्धव गटातील आणखी दोन आमदार फुटणार?

औरंगाबाद- Aurangabad

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटातील आणखी दोन आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. आमच्या संपर्कात फक्त आमदारच नाही तर मराठवाड्यातील दोन-तीन शिवसेना जिल्हाप्रमुख सोडले तर सर्वच जण संपर्कात असल्याचा दावा भुमरे यांनी केला आहे. 

- Advertisement -

आतापर्यंत सर्वच शिवसेना जिल्हाप्रमखांसोबत बोलणे झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रवेश सोहळ्याची तारीख ठरवतील असेही भुमरे म्हणाले आहे. मी आजही सांगतो की ठाकरे यांच्या गटातील आणखी दोन-तीन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या संपर्कात आहे. तसेच लवकरात लवकर ते शिंदे गटात सहभागी होणार आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही ते कोकणातील असतील आणि मराठवाड्यातील देखील असतील. तसेच आमदारांसोबतच मराठवाड्यातील दोन-तीन जिल्हाप्रमुख सोडले तर जवळपास सर्वच शिंदे गटाच्या संपर्कात आहे.

आमदार अंबादास दानवे यांनी आरोप केला आहे की, माझ्या सभेला पन्नास लोकं सुद्धा नव्हते. मी सभेला गेलो नव्हतो. मी जैन मंदिर आणि नाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मी कुणालाही आवाहन केले नव्हते की, तुम्ही गर्दी करा, मी फक्त आणि फक्त दर्शनासाठी गेलो व तिथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे तेथून जाणार असल्याने शुभेच्छा देण्यासाठी तिथे थांबलो. कुठलाही जाहीर कार्यक्रम नव्हता.

व्हीडिओमध्ये जे काही खुर्च्या दाखवण्यात आल्या आहेत, त्या माझ्या जाण्यापूर्वीच्या दाखवण्यात आल्या आहेत. मी मंत्री आहे. मंत्री असो या नसो पन्नास लोकं सुद्धा नव्हते हे बोलणं कितपत योग्य आहे. हे आपल्याला तरी पटले का?, मी कार्यालयात आलो तर दोन-चारशे लोकं असतात, मग मी पैठणला गेल्यावर पन्नास लोकं राहत नाही हे किती खोटे आरोप करायचे याला सुद्धा मर्यादा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या