औरंगाबादमध्ये ‘ट्रिपल तलाक’च्या दोन घटना

jalgaon-digital
1 Min Read

औरंगाबाद – aurangabad

शहरात बेगमपुरा आणि क्रांती चौक भागात दोन वेगवेगळ्या घटनेत विवाहितेला ‘ट्रिपल तलाक’ (Divorce) देण्याच्या घटना घडलेलेल्या आहे. याप्रकरणी संबंधित (police) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लग्नात कमी सामान दिले. तसेच कार दिली नाही. या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. तसेच विवाहितेला १ जुन रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान तिच्या माहेरी तिच्या पतीने सोडले. पत्नीला तीन वेळेस तलाक दिला. तसेच विवाहितेचे आई वडील समजविण्यासाठी गेले असता, त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पती अरबाज अत्ताउल्ला पठाणसह अन्य तिघांविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याशिवाय अन्य एका प्रकरणात विवाहिता पतीचे दुसरे लग्न लावून देण्यात आले. जेव्हा विवाहितेने याबाबत विचारणा केली असता, पतीने विवाहितेला तिहेरी तलाक दिला. ही घटना २३ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मुजीब कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी पती मोहम्मद अख्लाक उर्फ सलीम याच्यासह अन्य चार जणांवरोधात (Jinsi Police Thane) जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *