धोका ओमिक्रॉनचा  ; खोटी माहिती दिल्याने दोन प्रवाशांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद – aurangabad

कोरोना (corona) कालावधी तसेच (Omycron) ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता परदेशातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांची (Airport, railway station) विमानतळ, रेल्वेस्थानक येथे कोविड तपासणी (Covid check) केली जात आहे. पण काही नागरिकांकडून प्रवासाची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जात होता, या पार्श्वभूमीवर कोविड तपासणी करण्यास विरोध करणे अथवा खोटी माहिती प्रशासनास दिल्यास संबंधित प्रवाशावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमूखांच्या आढावा बैठकीत दिले.

ओमायक्रॉन संसर्गाची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण प्रमाण वाढवण्याबरोबरच परदेशातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांची व त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोविड तपासणी तसेच संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. परंतु काही प्रवाशी आपल्या परदेश प्रवासाची माहिती योग्य प्रकारे सांगत नसल्याने जिल्ह्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रतिबंध व उपाययोजनासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे.

आजपर्यंत दोन प्रवाशांवर गुन्हे दाखल केले असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले , ज्या प्रवाशांनी समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग कायदा 1897 अन्वये गुन्हे नोंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *