औरंगाबादमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण ;प्रशासन सज्ज

औरंगाबादमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण ;प्रशासन सज्ज

औरंगाबाद - aurangabad

शहरात कोरोना (corona) संसर्गाचा पुन्हा शिरकाव होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सोमवारी एक तरुण आढळला तर मंगळवारी कैसर कॉलनीतील ५७ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली. कोरोनाचे दोन रुग्ण (patient) सापडल्याने आरोग्य विभागात (Department of Health) खळबळ उडाली. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात ७५ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली.

महापालिकेच्या (Municipality) आरोग्य विभागाने कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मनपाच्या ४१ आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच पाच आरोग्य केंद्रांत ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली. काल सोमवारी मुकुंदवाडी-संजयनगर भागातील  २७ वर्षीय तरुण पॉझिटिव्ह निघाला. त्या पाठोपाठ मंगळवारी देखील कैसर कॉलनीमधील ५७ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कैसर कॉलनीतील महिलेने मनपाच्या आरोग्य केंद्रात चाचणी केली. परंतु, या महिलेने संपर्कासाठी दिलेला मोबाईल बंद येत असल्यामुळे तिच्याशी संपर्क होत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, चाचण्या वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दिवसभरात ४२ रुग्णांची आरटीपीसीआर आणि ३३ रुग्णांची अण्टिजेन अशी एकूण ७५ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून ही एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.

'मॉक ड्रिल' यशस्वी

कोरोनावरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणा कितपत सज्ज आहेत, याची तपासणी मंगळवारी करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील यंत्रणेची वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार तपासणी (मॉक ड्रिल) करण्यात आली.

चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे देशभरात खबरदारीचे पाऊल उचलण्यात येत आहे. देशभरात एकाच वेळी मंगळवारी 'मॉक ड्रिल' घेऊन कोरोनालढ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली. घाटीत काही दिवसांपूर्वी एक करोनावाधित रुग्ण दाखल झाला होता. घाटीतील खबरदारी म्हणून ऑक्सिजन, व्हेंटीलेटरसह विविध उपचार सोयी-सुविधांच्या परिस्थितीचा अधिष्ठाता डॉ.संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा घेण्यात आला.  मेडिसीन विभागप्रमुख डॉ.मीनाक्षी भट्टाचार्य यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या तरी नॉन कोव्हिड रुग्णालय म्हणून राहणार आहे. यावेळी ऑक्सिजन ते व्हेंटीलेटरपर्यंतच्या सर्व यंत्रणेची पडताळणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. संतोष कडले आदी उपस्थित होते

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com