लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या उशिराने; प्रवाशांचे हाल

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या उशिराने; प्रवाशांचे हाल

औरंगाबाद - aurangabad

'अग्निपथ' (Agneepath) योजनेचा विरोध करताना (Telangana Secunderabad) तेलंगणातील सिकंदराबादमध्ये हिंसक वळण लागले. त्यामुळे (South-Central Railway) दक्षिण-मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. दक्षिण-मध्य रेल्वे विभागातून लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार्‍या रेल्वेगाड्या उशिराने  धावत असल्याने गेल्या तीन ते चार दिवसापासून प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

काही लांबपल्याच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यामुळे अनेक प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन चुकले आहे. लांबपल्याच्या रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱया वाहतूकदारांनी तिकीटाचे दर वाढवून प्रवाशांची लुट करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या लष्कर भरती संदभातील अग्निपथ योजनेचा विरोध करताना तेलंगणातील सिकंदराबादमध्ये हिंसक वळण लागले. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागातून धावणार्‍या सिकंदराबाद-श्रीसाईनगर शिर्डी एक्सप्रेस, सिकंदराबाद ते तिरूवअनंतपुरम एक्सप्रेस, अजिंठा एक्स्प्रेससह अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या पुन्हा वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनमाड, मुंबई, हैदराबाद, सिकंदराबादकडे जाणार्‍या प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने ऑँडमिशन जाण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना देखील हिंसक आंदोलनाचा फटका बसला आहे. दरम्यान, आरक्षित तिकीट रद्द करावे लागल्याने अनेक प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन चुकले आहे. ज्यांना महत्वाच्या कामासाठी मुंबई, मनमाड अथवा इतरत्र जायचे आहे, त्यांना खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी झाल्याचे पाहुन खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्सचालकांनी देखील तिकीटाचे दर वाढविले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com