औरंगाबादेत मॅफोड्रोन ड्रग्सची तस्करी

औरंगाबादेत मॅफोड्रोन ड्रग्सची तस्करी

आरोपी जेरबंद

औरंगाबाद - Aurangabad

व्हाइट मॅजिक (White Magic) नावाने ओळखला असलेल्या प्रतिबंधित मॅफोड्रोन (Mafodron) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला पोलिस आयुक्तांच्या (Commissioner of Police) विशेष पथकाने सापळा रचून पकडले. ही कारवाई कर्णपुरा मैदानावर करण्यात आली. त्याच्या ताब्यातून अंमली पदार्थासहित सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जुनेद खान जावेद खान (वय २५, गल्ली क्र. ७, बारी कॉलनी) असे तस्कराचे नाव आहे.

अंमली पदार्थाची तस्करी करून विक्रीसाठी एक जण कर्णपुरा मैदानात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त निखिल गुप्ता (Commissioner of Police Nikhil Gupta) यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आयुक्तांच्या विशेष पथकाने कर्णपुरा भागात सापळा रचून रंगेहाथ जुनेद खान याला पकडले. त्याच्या ताब्यातून पथकाने ६.७३ ग्रॅम मॅफोड्रोन नावाचा अंमली पदार्थ आणि मोबाइल असा एक लाख १६ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक राहुल रोडे, जमादार सय्यद शकील, इम्रान पठाण, एम. बी. विखनकार यांच्या पथकाने केली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने हा प्रतिबंधित अंमली पदार्थ कोणाकडून आणला, याचा पोलिस शोध घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com