औरंगाबादेत अजूनही टोसिलिझुमॅब 'आऊट ऑफ स्टॉक'! 

ॲम्फोटेरिसिन इंजेक्शनही मिळेना   
औरंगाबादेत अजूनही टोसिलिझुमॅब 'आऊट ऑफ स्टॉक'! 

औरंगाबाद - Aurangabad

गंभीर कोव्हिड रुग्णांना उपयुक्त ठरणारे टोसिलिझुमॅब गेल्या अनेक दिवसांपासून मिळत नसल्याची स्थिती कायम असून, हे इंजेक्शन वेळेवर मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना फार मोठी धावपळ करण्याची वेळ येत आहे. अनेकांना तर धावपळ करुनही ते मिळत नसल्याने उपचारांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या औषधांचा पुरवठा नियंत्रित केला जात असला तरी टोसिलिझुमॅबचा पुरवठा होतच नसल्याचे रुग्णालयांमधून स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे, म्युकरमायकॉसिसच्या रुग्णांना गरजेच्या ॲम्फोटेरिसिन इंजेक्शनचा अजूनही अपेक्षित प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे उघड झाले आहे.

औरंगाबाद- गंभीर कोव्हिड रुग्णांना उपयुक्त ठरणारे टोसिलिझुमॅब गेल्या अनेक दिवसांपासून मिळत नसल्याची स्थिती कायम असून, हे इंजेक्शन वेळेवर मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना फार मोठी धावपळ करण्याची वेळ येत आहे. अनेकांना तर धावपळ करुनही ते मिळत नसल्याने उपचारांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या औषधांचा पुरवठा नियंत्रित केला जात असला तरी टोसिलिझुमॅबचा पुरवठा होतच नसल्याचे रुग्णालयांमधून स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे, म्युकरमायकॉसिसच्या रुग्णांना गरजेच्या ॲम्फोटेरिसिन इंजेक्शनचा अजूनही अपेक्षित प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे उघड झाले आहे.

रेमडेसिव्हिरचा पुरवठा मागेच नियंत्रित करण्यात आला आहे आणि सद्यस्थितीत कोव्हिड रुग्णांना अपेक्षित प्रमाणात रेमडिसिव्हिर मिळत असल्याचा नक्कीच दिलासा आहे. अर्थात, बाधितांची संख्या उल्लेखनीय प्रमाणात कमी झाली असल्यानेही रेमडेसिव्हिरच्या उपलब्धतेचा प्रश्न सध्या तरी राहिलेला नाही. मात्र सध्या जे काही कोव्हिडचे रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल होत आहे, त्यामध्ये गंभीर स्थितीत दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये बाहेर जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. यापैकी अनेकांना टोसिलिझुमॅबची गरज पडत आहे; परंतु ते वेळेवर मिळत नसल्याने डॉक्टरांची पंचाईत होत आहे.

अनेक नातेवाईक मंडळी बाहेर गावाहून ते उपलब्ध करण्यासाठी कसरत करत आहे. या संदर्भात शहरातील अतीव दक्षता तज्ज्ञ डॉ. आशिष कठाळे म्हणाले, सायटोकाईन स्टॉर्म अवस्थेमध्ये रुग्ण पोहोचल्यानंतर आणि 'आयएल सिक्स'चे प्रमाण शंभरच्या पुढे गेल्यानंतर व 'सीआरपी'चे प्रमाणही अपेक्षेपेक्षा वाढल्यानंतर रुग्णाला टोसिलिझुमॅब इंजेक्शन देणे लाभदायी ठरते. सायटोकाईन स्टॉर्म अवस्थेच्या खूप उशिरा हे इंजेक्शन देणे फारसे उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे हे इंजेक्शन कधी द्यायचे हे निश्चित आहे आणि त्याआधी किंवा त्यानंतर देऊन त्याचा उपयोग नाही. त्यामुळे हे इंजेक्शन योग्य वेळी उपलब्ध झाले तरच त्याचा खरा उपयोग आहे, असेही डॉ. कठाळे म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com