वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरू करणार- ना.संदिपान भुमरे

वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरू करणार- ना.संदिपान भुमरे

औरंगाबाद - aurangabad

पैठण - औरंगाबादचे (Paithan - Aurangabad) पालकमंत्री संदिपान भुमरे (Guardian Minister Sandipan Bhumre) यांनी पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात दिवाळीनिमित्त संत स्रेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अनेक मठातील संत-महंतांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. दरम्यान यावेळी बोलतांना भुमरे यांनी महत्त्वाची घोषणा करताना वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यात वारकऱ्यांसाठी ही पहिलीच स्वतंत्र बँक असणार असल्याचे बोलले जात आहे.

वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरू करणार- ना.संदिपान भुमरे
Breaking news तापी नदीत ट्रक कोसळला ; चालकाचा शोध सुरू, सहचालक बचावला
वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरू करणार- ना.संदिपान भुमरे
Video तापी नदीत असा कोसळला ट्रक...

भुमरे यांनी पैठणच्या निवासस्थानी संत स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे याचवेळी अनेक मठातील संत-महंतांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. तर त्यांच्यासाठी भोजनाचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरू करण्याबाबत इच्छा बोलून दाखवली. सोबतच त्यासाठी जी काही मदत लागेल ती करण्यासाठी तयार असल्याचे देखील भुमरे म्हणाले. वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक असायला हवी आहे. तुम्ही जर पुढाकार घेतला तर माझी जी काही मदत असेल ती करायला तयार आहे. वारकऱ्यांसाठी जर स्वतंत्र बँक असेल तर वेळोवेळी मदत झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुम्हाला कधीच कुणासमोर हात पसरवण्याचे काम पडणार नाही. जेव्हा गरज पडेल तेव्हा वारकऱ्यांची हक्काची बँक राहील. त्यामुळे सर्वच संत-महंतांसह वारकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी निश्‍चित माझ्याकडून जी काही मदत लागेल ती करण्यासाठी तयार असल्याचं भुमरे म्हणाले. या घोषणेचे उपस्थित वारकऱ्यांनी स्वागत केले.

एकनाथी भागवत सुरू करणार


यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, ज्याप्रमाणे देहूला, आळंदीला भागवत मंदिर आहे. त्याप्रमाणे पैठणला देखील एकनाथी भागवत मंदिराची उभारणी करणार असल्याची घोषणा देखील यावेळी भुमरे यांनी केली. त्यामुळे मी शब्द देतो की, एकनाथी भागवत मी करणारच. तसेच पैठण घाटावर आरती सुरू करण्याबाबत निर्णय  घेतला जाणार असल्याचे देखील भुमरे यांनी नमूद केले. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com