शहरातील अभ्यासिकांना ‘लॉकडाऊन’मधून सूट द्या

आ.सतीश चव्हाण यांची मागणी
शहरातील अभ्यासिकांना ‘लॉकडाऊन’मधून सूट द्या

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद शहरातील अभ्यासिकांना ‘लॉकडाऊन’मधून सूट द्यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली आहे.

आ.सतीश चव्हाण यांनी विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने 11 मार्च ते 4 एप्रिल 2021 दरम्यान अंशत: लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच शनिवार व रविवार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच बंद राहणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 21 मार्च 2021 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा, 27 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, 11 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍यांमध्ये ग‘ामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांची सं‘या मोठ्या प्रमाणावर आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शहरात राहून अभ्यासिकांमध्ये हे विद्यार्थी अभ्यास करून या परीक्षेची तयारी करीत आहेत.

येणारे आठ-पंधरा दिवस हे सदरील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. अगोदरच औरंगाबाद शहरातील अभ्यासिका या 50 टक्के उपस्थितीत सुरू आहेत. त्यात आपण घेतलेल्या निर्णयामुळे सदरील अभ्यासिका या सोमवार ते शुक‘वार रात्री 9 तर शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या दृष्टीने मोठी गैरसोय होत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून औरंगाबाद शहरातील अभ्यासिका सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com