Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedवेरूळ लेणी परिसरात दिसला वाघ!

वेरूळ लेणी परिसरात दिसला वाघ!

औरंगाबाद – Aurangabad

जागतिक पर्यटन वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी (Ellora Caves) परिसरात आज सकाळी एका नागरिकास डोंगर कपारीत वाघ (Tiger) दिसल्याचा व्हिडिओ (Video)_व्हायरल झाल्याने वेरूळ, खुलताबाद (Khultabad), सुलीभंजन आणि म्हैसमाळ या परिसरात खळबळ उडाली, मात्र वन विभागाने या परिसरात मागील दोन वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे, यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये वाघ नसून बिबट्या असू शकतो असा दावा केला आहे. तसेच पर्यटक आणि परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

- Advertisement -

मागील दोन वर्षांपासून वेरूळ, खुलताबाद सुलीभंजन आणि म्हैसमाळ परिसरात बिबट्याचा वावर आहे. व्हायरल व्हिडिओमुळे पर्यटक आणि परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वन विभागाची (Forest Department) पथके सतर्क असून परिसरात पाहणी करत आहेत. – अण्णासाहेब तेहरकर, वन परिक्षेत्र, अधिकारी, खुलताबाद

- Advertisment -

ताज्या बातम्या