दहाचाकी ट्रक चोरणारे तिघे गजाआड

गुन्हे शाखेची कामगिरी
दहाचाकी ट्रक चोरणारे तिघे गजाआड

औरंगाबाद - Aurangabad

रेणुका माता कमानीच्या बाजुला उभा केलेला दहा चाकी ट्रक चोरणार्‍या तिघा आरोपींना गुन्हे शोखेच्या पथकाने अटक केली.

साबेर शब्बीर पठाण (30, रा. जटवाडा रोड, अंबरहिल), साबेर शेख कादर (32, रा. तिरंगाचौक, धुळे) आणि इलियास अहमद मोहम्मद रईस शहा (42, रा. अन्सार कॉलनी, धुळे) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात गारखेडा परिसरातील इंदिरा नगरात राहणारे शेख जब्बार शेख भिकन (58) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादीकडे दहा चाकांचा ट्रक (क्रं. एमएच-20-एटी-2181) असून सदर ट्रक त्यांचा मुलगा शेख सिकंदरहा चालवतो.

2 एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर ट्रकचे टायर बदलण्याचे काम केल्यानंतर सिकंदरने ट्रक रेणुकामाता कमानीजवळील शिरीन टायर वर्कसच्या बाजुला उभा केला व तो घरी आला. दुसर्या दिवशी सकाळी सिंकदर ट्रक घेण्यासाठी गेला असता, ट्रक चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास सुरु असतांना गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, सदरील ट्रक साबेर शब्बीर पठाण आणि जाहेद शेख यांनी चोरी केला. माहिती आधारे पथकाने साबेर पठाण याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने जाहेद शेख याच्या साथीने ट्रक चोरी केल्याची कबुली दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com