Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedतीन मोटार ड्रायव्हिंग स्कूलला टाळे

तीन मोटार ड्रायव्हिंग स्कूलला टाळे

औरंगाबाद – aurangabad

मान्यता घेतलेल्या ठिकाणावर डायव्हिंग स्कूल (Diving school) न चालविता शहरात धंदा करणाऱ्या तीन मोटार ड्रायव्हिंग स्कूलला (Motor Driving School) आरटीओ (rto) कार्यालयाने सिल लावल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.

- Advertisement -

औरंगाबाद शहरात काही दिवसांपासून मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांची मुजोरी वाढली आहे. लायसन्स काढण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन उमेदवार नसताही लायसन्स देणाऱ्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकाने परवाना घेतलेल्या ठिकाणी ड्रायव्हिंग स्कूल न चालविता शहरात ड्रायव्हिंग स्कूल सुरू करणाऱ्यांविरुद्ध आरटीओ कार्यालयाने पुन्हा एकदा धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, सहायक परिवहन अधिकारी मनीष दौड, मोटार वाहन निरीक्षक नीलेश लोखंडे, दीक्षा आढाव व अश्विनी खोत यांच्या पथकाने शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलची पाहणी केली. त्यात कुबेर मोटार ड्रायव्हिंग स्कूलला शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये परवानगी दिली होती.

मात्र, त्याने पुंडलिकनगर रोडवरील गोपाळ स्वीट मार्ट येथे बोर्ड लावून व्यवसाय सुरू केला होता. तसेच आदर्श मोटार डायव्हिंग स्वूरूलचालकाची परवानगी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील असताना त्याने मुकुंदवाडी येथे कार्यालय उघडून व्यवसाय सुरू केला होता तर न्यू मॉडर्न ड्रायव्हिंग स्कूलचालकाने कुंभेफळ येथे मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू केले. मात्र, प्रत्यक्षात रामनगर-विठ्ठलनगर येथे डायव्हिंग स्कूल सुरू केले होते. या डायव्हिंग स्कूलची प्रत्यक्षात तपासणी केली असता ड्रायव्हिंग स्कूल काढण्यासाठी घेतलेली परवानगी व प्रत्यक्षात तिथे व इतर ठिकाणी कार्यालय उभारून ड्रायव्हिंग स्कूल सुरू केल्याचे आढळून आले. याप्रकरणी आरटीओ कार्यालयाची कुठलीच परवानगी न घेता अशाप्रकारे फसवणूक केली म्हणून या तीनही ड्रायव्हिंग स्कूलला सिल ठोकण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या