आयपीएलवर सट्टा लावणारे तिघे गजाआड

सव्वाचार लाखाचा ऐवज जप्त 
आयपीएलवर सट्टा लावणारे तिघे गजाआड

आयपीएलवर सट्टा लावणारे तिघे गजाआड

(ipl) आयपीएलच्या लखनौ जायंट्स (Lucknow Giants) विरुद्ध गुजरात टाईटन्स मॅचवर (Gujarat Titans match) ऑनलाईन (Online) सट्टा खेळणाऱ्या तिघांना (police) गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारुन अटक केली. ही कारवाई मंगळवार दि.१० रात्री चिकलठाणा येथील लक्ष्मीनगरातील एका गोडावूनबर करण्यात आली. आरोपींकडून नऊ मोबाइल, दोन रजिस्टर, कार, नऊ हजारांची रोख असा सुमारे चार लाख १९ हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

शुभम संजय पांडे (२३, रा. बेगमपुरा), राजेश विक्रम गावंदे (३६, रा. चुनाभट्टी, खोकडपुरा) आणि राजेश सुधाकर पुंड (५१, रा. बन्सीलालनगर, रेल्वेस्टेशन) अशी आरोपींची नावे असुन त्यांना गुरुवार दि.१२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी दिले. गुन्हे शाखेच्या पथकाला सूत्रधाराकडून मिळाली होती की, चिकलठाणा परिसरातील लक्ष्मी नगरात एका गोडावून व कारमध्ये शुभम पांडे आयपीएल मधील लखनौ जायंटस्‌विरुद्ध गुजरात टाईटन्स मॅचवर सट्टा लावत आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक महांडुळे यांच्या पथकाने लक्ष्मीनगरातील गोडावून छापा टाकून वरील तिघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता मोबाइलवर किंगफिशर १०१० लो या वर क्रिकेटच्या लाईव्ह मॅचवर सट्टा खेळणाऱ्या लोकांकडून सट्टा घेतो व त्याची नोंद रजिस्टरमध्ये करतो अशी माहिती आरोपींनी दिली.

आरोपींची झडती घेण्यात आली असता, आरोपी शुभम पांडे याच्या ताब्यातून सट्टा खेळण्यासाठी वापरली जाणारी कार (एमएच- ०२-एव्ही-१५११), सहा मोबाइल, वायफाय राऊटर, दोन रजिस्टर, आठ हजार ९५० रुपयांची रोख रक्कम तर आरोपी राजेश गावंदे याच्या ताब्यातून दोन आणि राजेश पुंड याच्या ताब्यातून एक मोबाइल असा सुमारे चार लाख १९ हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

Related Stories

No stories found.