... तर महावितरण सर्वात जास्त महसूल घेणारी कंपनी!

सध्या ५० टक्केच ग्राहकांना अचूक बिल
... तर महावितरण सर्वात जास्त महसूल घेणारी कंपनी!

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


वीज वितरण कंपनीच्या (Electricity Distribution Company) तीन कोटी वीज ग्राहकांपैकी फक्त ५० टक्के ग्राहकांची योग्य बिलिंग होत आहे. १०० टक्के वीज ग्राहकांची अचूक बिलिंग झाल्यास महावितरण कंपनी जगातील सर्वात जास्त महसूल घेणारी कंपनी होईल. त्यामुळे वीज ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासह महसूलवाढीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सुरळीत वीजपुरवठा, अचूक बिलिंग व वापरलेल्या प्रत्येक युनिटची वीज बिल वसुली केली तरच महावितरण प्रगतिपथावर जाईल. त्यासाठी महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी केले.

... तर महावितरण सर्वात जास्त महसूल घेणारी कंपनी!
आमदारांकडून सत्तेचा दुरुपयोग-वैशाली सुर्यवंशी

महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने तांत्रिक कामगारांच्या कार्यशाळेचे आयोजन मौलाना आझाद संशोधन केंद्रात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर, अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे, प्रवीण दरोली, संजय सरग, आर.पी. चव्हाण, कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, महेश पाटील, दीपक सोनोने, योगेश देशपांडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्‍वास पाटील, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्‍वर आर्दड, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, कार्यकारी अध्यक्ष आर.पी. थोरात, उपसरचिटणीस कैलास गौरकर, बी.डी. पाटील, संतोष वाघमारे व जाफर पठाण आदींची उपस्थिती होती.

संचालक (संचालन) यांनी पॉवरपॉइंट प्रझेंटेशनद्वारे महावितरणची पायाभूत यंत्रणा, थकबाकीची स्थिती, बीज वितरण क्षेत्रात केलेले अतुलनीय कार्य यावर सविस्तर विवेचन केले. कार्यशाळेच्या प्रास्ताविकामध्ये सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन म्हणाले, संचालक (संचालन) ताकसांडे हे कर्मचाऱयांच्या प्रश्‍नांबाबत सकारात्मक असतात. तांत्रिक कामगारांचे प्रश्‍न त्यात यंत्रचालकांची अनॉमली, मराठवाड्यातील यंत्रचालकांचा बंद झालेला कामाचा मोबदला, प्रधान तंत्रज्ञ, मुख्य तंत्रज्ञ यांना महापारेषणप्रमाणे यंत्रचालक संवर्गात जाण्याचा मार्ग खुला करणे, प्रधान तंत्रज्ञांना पेट्रोल भत्ता देणे, २०० उपकेंद्रांचा एम.पी.आर. देऊन कायम कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करणे आदी मागण्यांवर २४ मे रोजी मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे संचालकांनी मान्य केले, असे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com