१२ डिसेंबर पासून पोस्ट ऑफिसचा हा आहे नवा नियम

अंमलबजावणी न झाल्यास खात्यातून कापले जातील 100 रुपये
१२ डिसेंबर पासून पोस्ट ऑफिसचा हा आहे नवा नियम

नवी दिल्ली - New Delhi

पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर हा नवीन नियम तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.

दि.12 डिसेंबर 2020 पासून एका महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहे. इंडिया पोस्ट ऑफिस बचत खात्यामधील मिनिमम बॅलन्स जमा करण्यासाठीची डेडलाइन निश्चित केली आहे.

इंडिया पोस्टने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. या ट्वीटनुसार पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक 500 रुपये जमा असणं आवश्यक आहे. उद्या म्हणजेच 11 डिसेंबरपर्यंत तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात ही रक्कम जमा असणं आवश्यक आहे.

याआधी इंडिया पोस्टने त्यांच्या ग्राहकांना याबाबत आठवण करून देणारा मेसेज देखील पाठवला होता. पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असणं अनिवार्य आहे, असं या मेसेजमधून सांगण्यात आलं होतं. जर तुम्हाला मेंटेनन्स चार्ज द्यायचा नसेल तर 11 डिसेंबर 2020 आधी तुमच्या खात्यामध्ये कमीतकमी 500 रुपये जरुर मेंटेन करा.

तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक 500 रुपये नसतील तर तुमच्याकडून आर्थिक वर्षाच्या शेवटी 100 रुपयांचे मेंटेनन्स शुल्क कापले जाईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com