Monday, April 29, 2024
HomeUncategorizedएसटीचे स्मार्ट कार्ड काढण्याची हि आहे शेवटची तारीख

एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्याची हि आहे शेवटची तारीख

औरंगाबाद – aurangabad

एसटी (s t) महामंडळाच्या बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना (Senior citizen) सवलीच्या दरात प्रवास करता येतो. त्यासाठी स्मार्ट कार्ड (Smart card) असणे बंधनकारक आहे. सदरचे कार्ड काढण्यासाठी ३० जूनपर्यंत नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे अनेकांना नोंदणी करणे शक्य झाले नाही. दरम्यान, स्मार्ट कार्ड नोंदणी दोन महिने मुदत वाढ देण्यात आली असून ही मुदतवाढ आता ३१ ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी काहीसा वेळ मिळाला आहे.

- Advertisement -

बनावट आधार कार्डच्या आधारे अनेक जण ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीचा गैरफायदा घेत होते. यावर पायबंद घालण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना ही अमलात आणली. या कार्डच्या नोंदणीसाठी ३० जून ही शेवटची तारीख ठेवण्यात आली होती. एक जुलैपासून स्मार्ट कार्ड असेल तरच प्रवासाची मुभा होती. अशातच अनेक ज्येष्ठांना काही कारणांमुळे स्मार्ट कार्डची नोंदणी करता आली नाही. एसटी महामंडळाने नाव नोंदणीची मुदत दोन महिन्यांनी वाढविली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करून स्मार्ट कार्ड घेण्याची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महामंडळाकडून माहितीनुसार महाराष्ट्र (maharastra) राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून २९ प्रकारातील विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ.आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुरस्कार, अधिस्वीकृतीधारक, दुर्धर आजार अशा विविध सवलत धारकांचा समावेश आहे.

या सवलतीसाठी प्रवाशांना स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमात हातभार लावण्यासाठी महामंडळाने २०१८-१९ मध्ये सवलत धारक प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली. ती लागू झाल्यानंतर विना कार्ड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही प्रवास सवलत देण्यात येणार नाही, असेही महामंडळाने जाहीर केले आहे. मुख्य म्हणजे तेव्हापासून विविध कारणांमुळे योजनेला मुदतवाढ मिळत आहे. मात्र, या वेळची मुदतवाढ अंतिम आहे. मात्र, आषाढीमुळे आणखी एकदा सवलत द्यावी लागली. १ सप्टेंबरपासून कार्ड अनिवार्य आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या