Friday, April 26, 2024
HomeUncategorizedघरातील शिवीगाळ ॲट्रॉसिटी नव्हे-औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

घरातील शिवीगाळ ॲट्रॉसिटी नव्हे-औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

चार भिंतीच्या आत अर्थात घरामध्ये झालेली शिवीगाळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा होऊ शकत नसल्याचा निवांळा मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) नुकताच दिला.

- Advertisement -

पुढील चार दिवस धोक्याचे ; मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

नगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे यांच्यावर नामदेव डामसे (रा.शेणीत) यांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ऍट्रॉसिटी) अकोले पोलिस ठाण्यात १५ ऑक्टोबर २०२० रोजी गुन्हा दाखल केला होता. यावर दराडे यांनी गुन्हा रदद करण्यासाठी अँड. मयूर साळुंके यांच्या मार्फत न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होतो. दराडे त्यांच्या पत्नीशी बोलत असताना डामसे मोबाइलवर रेकॉर्ड कर्त होते. हा प्रकार पाहून दराडे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप डामसे बांनी केला होता, यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र, फिर्यादीने राजकीय द्वेषापोटी आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. दराडे यांच्या पत्नी सुषमा यांनी ग्रामपंचायतीमधील अपहाराचा मुद्दा लावून धरला आहे. याचा राग फिर्यादीच्या मनात होता. यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. तसेच आलेली घटना ही आरोपीच्या घरामध्ये म्हणजेच चार भिंतीच्या आत झालेली आहे. यामुळे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम या प्रकरणात लागू होत नाही. या घटनेला कोणताही त्रयस्त साक्षीदार नाही, असा युक्तिवाद केला. सदरील युक्तिवाद ग्राह्य धरून बाजीराव दराडे यांच्या विरोधात दाखल असलेली फिर्याद व आरोपपत्र रद्द केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या