Monday, April 29, 2024
HomeUncategorized‘ही’ कंपनी जाणार पहिल्या वहिल्या अंतराळ मोहिमेवर

‘ही’ कंपनी जाणार पहिल्या वहिल्या अंतराळ मोहिमेवर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हर्जिन गॅलेक्टिक (virgin galactic) आणि ब्लू ओरिजिनने (blue origin) रिचर्ड ब्रॅन्सन (Richard Branson) आणि जेफ बेझोस (jeff bezos) यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटकांना अंतराळाचे दर्शन घडविले आहे…

- Advertisement -

आता एलोन मस्क (Elon Musk) यांची कंपनी स्पेसएक्स (SpaceX) पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. स्पेसएक्स कंपनी 15 सप्टेंबरला पहिले मिशन ‘इंस्पिरेशन 4’ (Inspiration4) सुरू करण्याच्या तयारीत आहे.

या मिशनमध्ये सामान्य नागरिकांचा समावेश असणार आहे. फ्लोरिडाच्या (Florida) केनेडी स्पेस सेंटरमध्ये (kennedy space center) नासाच्या पॅड 39 ए मधून ‘इंस्पिरेशन 4’ लॉन्च केले जाईल.

‘इंस्पिरेशन 4’ स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या सानुकूलित उड्डाण मार्गात दर दीड तासांनी ग्रहाभोवती फिरणार आहे. तीन दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर हे ड्रॅगन कॅप्सूल परत येणार आहे. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील समुद्रात ड्रॅगन कॅप्सूल उतरेल.

या मोहिमेचे नेतृत्व करणारे जेरेड आयझॅकमन (Jared Isaacman) हे एक अनुभवी पायलट आहेत. या तीन दिवसांच्या कालावधीत मानवी शरीरावर अंतराळाचा कसा परिणाम होतो, हे पाहण्यासाठी प्रयोग केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या