Monday, April 29, 2024
HomeUncategorizedबँकिंग क्षेत्रात तीस हजार नवे रोजगार-अर्थराज्यमंत्री डॉ.कराड

बँकिंग क्षेत्रात तीस हजार नवे रोजगार-अर्थराज्यमंत्री डॉ.कराड

औरंगाबाद – aurangabad

आगामी काळात देशभरात दहा लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे यात बँकिंग क्षेत्रात ३० हजार जागा भरणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने ७५ डिजिटल बँकिंग युनिटचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर डॉ.कराड यांनी माध्यमांशी संवाद साधला. डॉ. कराड म्हणाले. या डिजिटल युनिटमधून पारदर्शीपणे व्यवहार होणार आहे. देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्याचे पंतप्रधानांचे लक्ष आहे. मी नरेंद्र मोदी यांना मंत्री झाल्यानंतर भेटल्यानंतर त्यांनी मला फायनान्शियल लिटरसी(आर्थिक साक्षरता) डिजिटल व्यवहार यावर काम करण्याचे सांगितले होते. त्यानुसार देशभरातील २१ राज्यांत बँकांच्या बैठका घेतल्या. त्यात कामही केले. आज डिजिटलकडे सर्वांनी वळावेत. डिजिटल व्यवहारासाठी एका शाखेतून किमान शंभर खाते करावेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. यामुळे व्यापारी, उद्योजक, लघुउद्योजकांनी आपले व्यवहार हे डिजिटलच्या माध्यमातून त्यांनी उल्कानगरी भागातील शाखेच्या माध्यमातून व्यवहार करावा, असे आवाहन डॉ. भागवत कराड यांनी केले.
माध्यमातून राज्यात सातारा आणि औरंगाबाद या जिल्ह्यात दोन डिजिटल बँकिंग युनिट सुरू झाले.

औरंगाबादच्या युनिटमध्ये चार मशीन्सच्या माध्यमातून २५ ते २७ प्रकाराच्या सेवा ग्राहकांना मिळणार असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी सांगितले. यात अगदी गृह, वाहन कर्जापासून ते सर्व प्रकारचे कर्जासाठीचे अर्जप्रक्रिया सर्व बँकांच्या या डिजिटल बँकेच्या माध्यमातून करू शकतो. याच युनिटमध्ये ओक नॉन असिस्टंट झोनमध्ये सर्व चार मशीन असेल ते चोवीस सेवा मिळणार आहे. असिस्टंट झोनमध्ये दोन अधिकारी जोडले आहे. ज्यांना डिजिटल बँकिंगची माहीत नाही. त्यांना ट्रेनिंग देणार आहे. याच युनिटच्या माध्यमातून शंभर व्यापाऱ्यांना डिजिटल जोडण्यासाठीची सुरुवात करणार. जो खाते उघडेल त्याला व्हॉटस्‌अप, मोबाइल बँकिंग आणि इंटनरेनट बँकिंग देणार आहे. यात आणखी वाढविण्यासाठी आग्रही भूमिका करणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या