या आहेत पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांगा

या आहेत पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांगा

आपण ज्या (Earth) पृथ्वीवर राहतो तिला अनेक उंच (Mountains, rivers, springs) पर्वत, नद्या, झरे, दर्‍या यांनी नटविले आहे. निसर्गाची ही अमोल देणगी आहे. अनेकांना हे माहित नसेल की पृथ्वीवरील मोठ्या 15 पर्वतरांगांची एकूण लांबी 35200 किमी असून पृथ्वीच्या परिघाच्या ती फक्त 5 हजार किमीने कमी आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक लांबीची पर्वतरांग आहे अँडिज. तिची लांबी 7 हजार किमी असून ही पर्वत रांग 7 देशांना जोडणारी आहे.

पृथ्वीवरच्या या 15 महत्वाच्या पर्वतरांगा एकूण 37 देश जोडतात. येथील सर्वात छोटी पर्वतरांग 300 किमीची असून तिचे नाव आहे पामेर.

येथील दोन नंबरची पर्वतरांग आहे रॉकीज. ती 4800 किमीची असून (Canada ) कॅनडा आणि अमेरिका या देशांना जोडते.

तीन नंबरवर आहे ग्रेट डिव्हायडिंग रेंज. ही 3500 किमीची पर्वतरांग फक्त (Australia) ऑॅस्ट्रेलियात आहे. चार नंबरची ट्रान्स अंटार्टीका रेंजही 3500 किमी आहे.

या यादीत पाच नंबरवर आहे 3000 किमी लांबीची कूनलुन पर्वतरांग. ती चीन मध्ये आहे.

सहा नंबरवर युराल पर्वतरांग असून ती 2500 किमी आहे. ती (Russia) रशिया आणि कझाकिस्तान (Kazakhstan) मध्ये आहे.

सात नंबरवर अ‍ॅटलास पर्वत रांग असून 2500 किमी लांबीची ही रांग तीन देश जोडते.

आठ नंबरवर आहे हिमालय पर्वतमाला. ही 2400 किमीची असून (India, Pakistan, China, Nepal and Bhutan) भारत, पाकिस्तान, चीन, नेपाल आणि भूतान देश जोडते. नऊ नंबरवर तिचेनशान ही 1300 किमीची तीन देश जोडणारी पर्वतरांग आहे.

तर 10 नंबरवर आहे आल्प्स. ही आठ देश जोडते.

या यादीत 11 नंबरवर 1100 किमी लांबीची कॉकेशस पर्वतरांग असून ती चार देश जोडते.

तर 12 नंबरवर असलेली हिंदुकुश 950 किमीची असून चार देश जोडते.

13 नंबरवरची अलास्का 650 किमी लांबीची आहे पण ती जगातील सर्वात प्रसिद्ध धोकादायक पर्वतरांग आहे.

14 नंबरवर काराकोरम ही 500 किमी लांबीची पर्वतरांग भारत, चीन आणि पाकिस्तान देश जोडते.

15 नंबरची पामेर ही फक्त 300 किमी लांबीची पर्वतरांग आहे.

Related Stories

No stories found.