'जल बेल ॲप'वर पाण्याचे वेळापत्रकच नाही!

औरंगाबादकरांमध्ये नाराजी 
'जल बेल ॲप'वर पाण्याचे वेळापत्रकच नाही!

औरंगाबाद - aurangabad

आपल्या वसाहतीत पाणीपुरवठा कधी होईल, वेळ कोणती? पाणीपुरवठ्यास (Water supply) किती विलंब आहे आदी इत्यंभूत माहिती (Smart City) स्मार्ट सिटीच्या (Jal Bell App) जल बेल ॲपवर १० जुलैपासून मिळेल, असे मनपा प्रशासनाने जाहीर केले होते. परंतु, मोजक्याच वसाहतींचे वेळापत्रक ॲपवर असून शहरातील इतर वसाहतींचा त्यात समावेश करण्यात आला नाही.

चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असला, तरी ऍपमध्ये वेळापत्रकाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना हा ऍप डाऊनलोड करूनही काहीच उपयोग होत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. औरंगाबादमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची प्रचंड ओरड सुरू राहायची. त्यामुळे स्मार्ट सिटीने अप तयार करणार्‍या काही तरुणांना संपूर्ण शहराचे अप तयार करण्यास सांगितले. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर एका वॉर्डासाठी हे जलबेल ऍप तयार करण्यात आले. त्यात यश आल्यावर सिडको-हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी, रामनगर आदी वसाहतींचा त्यात समावेश करण्यात आला. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक त्या जल बेल ऍपवर अपडेट करून टाकण्यात आले. पाणीपुरवठ्यात विलंब होत असेल तर ऍपने माहितीही दिली जाते.

दहा हजाराहून अधिक नागरिकांनी ऍप डाऊनलोड करून घेतले. परंतु, आजही या ऍपवरील माहिती अपडेट करण्यात आलेली नाही. जुन्या शहरातील एकाही वसाहतीचा यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना ऍप डाऊनलोड करूनही त्रास सहन करावा लागतोय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com