Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजलमिटर केवळ व्यावसायिक नळांनाच

जलमिटर केवळ व्यावसायिक नळांनाच

औरंगाबाद – aurangabad

दोन दिवसांपूर्वीच झालेल्या (Smart City) स्मार्ट सिटीच्या बैठकीत नळांना (Water meter) जलमिटर लावण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, हे जलमिटर केवळ व्यावसायिक नळांनाच लावले जाणार आहे. तूर्तास तरी शहरातील घरगुती नळांना जलमिटर बसविले जाणार नाही, असा खुलासा पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय (Commissioner Astik Kumar Pandey) यांनी केला आहे.

- Advertisement -

औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत नळांना जलमिटर बसविण्याच्या कामासाठी 13 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानुसार आता लवकरच या कामाची निविदा देखील काढली जाणार आहे. याआधी समांतर जलवाहिनी प्रकल्पाची कंत्राटदार कंपनी एएमसीएलकडून शहरात नळांना जलमिटर बसविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळी नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे जलमिटर बसविण्याचा विषय मागे पडला.

आता नव्याने जलमिटर बसविण्याचा आणला गेला आहे. याविषयी पालिकाक प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीने केवळ व्यावसायिक नळांनाच जलमिटर बसविण्याचा तूर्तास निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. त्यात घरगुती नळांना जलमिटर बसविण्याच्या कामाचा समावेश नाही. त्यामुळे नागरिकांच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही. व्यावसायिक नळांना जलमिटर बसविण्याचे काम एप्रिल 2022 मध्ये म्हणजे नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभीलाच सुरू होईल, असेही आयुक्‍त पांडेय यांनी यावेळी नमूद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या