हुश्श... औरंगाबाद जिल्ह्यात एसटीसाठी एकही धोकादायक स्थळ नाही !

अहवाल सादर
हुश्श... औरंगाबाद जिल्ह्यात एसटीसाठी एकही धोकादायक स्थळ नाही !

औरंगाबाद- Aurangabad

'गाव तेथे एसटीची सेवा' (Village there ST service) असल्याने अनेक दुर्गम भागांपर्यंत बस (bus) धावत असते. दरवर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी पुरामुळे (flood) वाहतूक थांबणे किंवा पुलावरून पाणी जाणे अशा धोकादायक स्थळांवरून काही काळासाठी वाहतूक थांबवण्यात येते. परंतु, यंदा तसे धोकादायक ठिकाणे पाहणीत आढळून आले नाही. त्यामुळेच औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात एसटी बस (S.T.Bus)साठी असे धोकादायक स्थळ नसल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल अहिरे यांनी दिली.

पावसाळ्यापूर्वीच धोकादायक स्थळांची माहिती गोळा करण्याचे काम एसटी महामंडळाने हाती घेतले होते. कमकुवत पूल, पुलावरून पाणी जाण्याची शक्‍यता, कच्चे रस्ते, रस्ता खचण्याची शक्‍यता, तसेच धोकादायक वळण आदींची माहिती घेतली. जेणे करून अशा ठिकाणी अपघात होऊन आपत्कालीन परस्थिती निर्माण होणार नाही, त्याच बरोबर अशी घटना घडलीच तर काय उपाययोजना कराव्यात याचा आढावा घेण्यात आला. यात जिल्ह्यात एकही धोकादायक स्थळ नसल्याची खात्री झाल्याची माहिती अहिरे यांनी दिली. असे असले तरी चालकांना सुरक्षिततेबाबतचे मार्गदर्शन दरवर्षी करण्यात येते.

आढावा घेतला जिल्ह्यात पावसाळ्यात एसटीला धोका पोहचेल असे अपघात किंवा धोकादायक स्थळ नाही. दरवर्षी याचा आढावा घेतला जातो. असे असले तरी चालकांना पुलांवरून पाणी वाहत असताना, बस पुढे नेऊ नये किंवा कच्च्‌या रस्त्यांवरून बस सुरक्षितपणे चालवावी. आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर मदतीसाठी नजीकच्या आगारांशी किंवा संबंधित आगारांशी संपर्क साधावा अशा सूचना देण्यात येतात.

-अमोल अहिरे, विभागीय वाहतूक नियंत्रक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com