चित्रपटात कामाच्या बहाण्याने महिलेला केले ब्लॅकमेल

स्क्रीन टेस्टदरम्यान घेतलेल्या फोटोंबरोबर छेडछाड करत अश्लील फोटो तयार करून महिलेकडे केली ही मागणी
चित्रपटात कामाच्या बहाण्याने महिलेला केले ब्लॅकमेल

पुणे (प्रतिनिधी) Pune - चित्रपटांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने स्क्रीन टेस्टदरम्यान घेतलेल्या फोटोंबरोबर छेडछाड करत त्याने एडीटींग करून पॉर्नोग्राफीक इमेजेस म्हणजेच अश्लील फोटो तयार करून ४२ वर्षीय महिलेला शरीर सबंध ठेवण्याची मागणी करून नाही ठेवल्यास ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या राहुल श्रीवास्तव याला पोलिसांनी अटक केली आहे. तो मुळचा केरळचा आहे. तर महिला फॅशन डिझायनर आहे.

श्रीवास्तव आणि तक्रार करणारी महिला हे दोघेही व्हॉट्सअपवरील एका फॅशन इंडस्ट्रीशीसंबंधित ग्रुपमध्ये आहेत. तेथूनच त्यांची ओळख झाली आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून संवाद होऊ लागला. श्रीवास्तवने या माहिलेला चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले.

हा चित्रपट आपणच दिग्दर्शित करणार असल्याचे सांगून कामासंदर्भात बोलण्यासाठी आपण भेटूयात असं श्रीवास्तवने या माहिलेला सांगितलं. पुण्यातील साळुंखे विहार परिसरातील एका हॉटेलमध्ये श्रीवास्तवने या महिलेची भेट समीर नावाच्या व्यक्तीशी घडवून आणली. त्यानंतर काही दिवसांनी श्रीवास्तवने या महिलेला फोन करुन तुझं काम पाहून समीर प्रभावित झाला आहे असं सांगितलं. चित्रपटासाठी करार करण्याआधी एक स्क्रीन टेस्ट केली जाईल. स्क्रीन टेस्टसाठी तुला मुंबईला यावं लागेल असंही या श्रीवास्तवने या माहिलेला सांगितलं.

श्रीवास्तवने मुंबईला येण्यासंदर्भात माहिती दिल्यानंतर या महिलेने आपल्याला मुंबईला येणं शक्य होणार नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी व्हिडिओ कॉल सुरु असतानाच आरोपीने या महिलेचे काही फोटो घेतले आणि नंतर त्यात एडिटींगच्या सहाय्याने छेडछाड केली.

नंतर हे छेडछाड केलेले फोटो या महिलेला पाठवून श्रीवास्तवने तिला, 'माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तर मी हे फोटो व्हायरल करेल,' अशी धमकी दिली. या धमकीला भीक न घालता या महिलेने श्रीवास्तवकडे दूर्लक्ष केलं असता त्याने दोघांच्या कॉमन व्हॉट्सअप ग्रुपवर या फोटोंपैकी एक फोटो शेअर केला. श्रीनिवासच्या या कृत्यानंतर या महिलेने तो व्हॉट्सअप ग्रुप सोडला आणि त्याचा नंबर ब्लॉक केला. मात्र त्यानंतरही श्रीनिवास वेगवेगळ्या क्रमांकावरुन या महिलेला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवत होता. अखेर या प्रकरणाला वैतागून महिलेने पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली.

पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायदा आणि कलम ३५४ (विनयभंग करणे), ३५४ (अ) लैंगिक अत्याचार करणे, ३५४ (ड) (नजर ठेवणे) आणि ५०९ (अपमानास्पद वागणूक देणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com