Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedआठ हजार किलोमीटरवरून आला ‘हिवाळी पाहुणा’!

आठ हजार किलोमीटरवरून आला ‘हिवाळी पाहुणा’!

औरंगाबाद – jalgaon

जायकवाडी धरणावर (Jayakwadi Dam) स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून यंदा ८ वर्षाच्या खंडानंतर पहिल्यांदाच “युरेशीयन कर्ल्यू’ ने दर्शन दिले आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत इंटरनॅशनल युनीयन फॉर कर्न्झवेशन ऑफ नेचरच्या (IUCN) नोंदीप्रमाणे हा पक्षी धोका प्रवण श्रेणीत मोडतो. जगभरात केवळ ७ हजार युरेशीयन कर्ल्यू शिल्लक आहेत. अशावेळी त्याचे जायकवाडीवर आगमन सुखावह ठरत आहे.

- Advertisement -

उत्तरेकडे तसेच युरोपीय देशांमध्ये थंडी आणि बर्फवृष्टी सुरू झाल्याने तेथील पाणथळी गोठू लागतात. पक्ष्यांना खाद्य मिळत नसल्याने ते भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशांकडे स्थलांतरीत होतात. अशातच जायकवाडी परिसरात पावसाने भरलेल्या पाणथळी जागा आटू लागल्याने पक्ष्यांना आवश्यक तेवढी पाण्याची खोली तयार होते. यामुळे मोठ्या संख्येने हिवाळी पाहुणे दाखल होतात. युरेशीयन कर्ल्यू त्यापैकी एक असल्याची माहिती औरंगाबादचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी दिली. प्रतीक जोशी आणि राहुल परांजपे यांच्यासोबत त्यांनी जायकवाडीला पक्षी निरीक्षण केले.

आठ हजार किमीचे अंतर

युरेशीयन कर्ल्यू (शास्त्रीय नाव युरेशीअन अर्क्वाटा) स्कॉटलैंड तसेच युरोपीय देशातील पक्षी. ७ ते ८ हजार किलोमीटरचे अंतर पार करत तो शक्यतो गेल्या आठवड्यात जायकवाडीत दाखल झाला असावा. लांब टोकदार चोच, ४०० ते ८०० ग्रॅम वजन आणि वाळूच्या रंगाचा युरेशीयन कर्ल्यू वाळूवर लवकर लक्षात येत नाही. नर आणि मादी एकसमान दिसतात. तळपाठ पांढरी तर हिरवट निळे पाय आहेत. पाणी आणि चिखलातील अपृष्ठवंशीय प्राणी, कीटक हे त्याचे खाद्य. हिवाळा संपल्यावर प्रजननासाठी तो परत युरोपात जातो, असे डॉ.पाठक म्हणाले.

जगभरात सात हजार

आम्हाला आठ वर्षापूर्वी शिवणा टाकळी धरणावर युरेशीयन कर्ल्यू दिसला होता. वन विभागाच्या पुस्तकात त्याची नोंद आहे. यानंतर पहिल्यांदाच त्याचे दर्शन झाले. २० वर्षात त्यांची संख्या ५० टक्क्याने घटली. आता जगभरात असे केवळ ७ हजार पक्षी आहेत. यामुळे त्याचे महत्त्व वाढले आहे.

-डॉ. किशोर पाठक, मानव वन्यजीवरक्षक, औरंगाबाद

- Advertisment -

ताज्या बातम्या