Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedतिसऱ्या लाटेने घटवली विमान प्रवाशांची संख्या

तिसऱ्या लाटेने घटवली विमान प्रवाशांची संख्या

औरंगाबाद Aurangabad

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासूनच देशभरात कोरोना (Corona) रूग्णांची (patients) संख्या वाढली. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा सर्वात मोठा फटका औरंगाबाद विमानतळाला (airport) पोहोचला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात औरंगाबाद विमानतळावरून (Aurangabad Airport) ६५ हजार प्रवाशांनी (passengers) प्रवास केला होता. जानेवारी महिन्यात ही संख्या १५ ते १८ हजार राहिली असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

औरंगाबाद विमानतळावरून सध्या इंडिगो आणि एअर इंडिया या दोन विमान कंपन्यातर्फे प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. एअर इंडियाचे विमान मुंबई औरंगाबाद दिल्ली या मार्गावर उड्डाण करीत आहे. तर इंडिगो कंपनीने दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या तिन शहरांसाठी औरंगाबादहून विमान सेवा सुरू केली होती. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत होती. ही संख्या वाढताच विमान प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी विमान प्रवास रद्द केले. इंडिगो विमानाच्या दिल्ली आणि मुंबईसाठी असलेल्या विमानातून प्रवास करणाऱ्या ४५ टक्केपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास रद्द करण्याचे जाहीर केले होते. या प्रवाशांनी विहिती मुदतीत त्यांचा विमान प्रवास रद्द केल्याने विमानतळ प्राधिकरणाने ठरविलेल्या नियमाप्रमाणे कंपनीने त्यांचे पैसे परत केले.

विमान प्रवाशांची कमी झालेली संख्या तसेच दिल्लीहून औरंगाबादकडे येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या कमी झाल्याने, औरंगाबादहून इंडिगो कंपनीच्या विमान सेवा रद्द करण्याचा निर्णय इंडीगो प्रशासनाने घेतला. या विमानतळावरून मुंबई आणि दिल्ली सह हैदराबादची विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. इंडिगो विमान कंपनीने त्यांची सेवा बंद केल्याने, एअर इंडिया विमानातून प्रवाशांना मुंबई आणि दिल्लीचा प्रवास करावा लागत आहे.

दररोज दोनशेच्या जवळपास जाणारे आणि अडीचशेच्या दरम्यान प्रवासी येणार असतात. दररोज विमानतळावर पाचशेच्या जवळपास विमान प्रवास येत आहेत. औरंगाबाद विमानतळावरून फक्त एक विमान दोन शहरांसाठी सुरू असल्याकारणाने विमान प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे. जानेवारी महिन्यात औरंगाबाद विमानतळावरून १५ ते १८ हजार विमान प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर डिसेंबर २०२० मध्ये औरंगाबादहून करोनाच्या काळात १८ हजार ६४० विमान प्रवाशांनी प्रवास केला होता. ही संख्या डिसेंबर २०२१ मध्ये ६२ हजार २७ इतकी होती. करोनाच्या भितीमुळे एकाच महिन्यात औरंगाबाद विमानतळावरून जाणाऱ्या विमान प्रवाशांची संख्येत ४० हजाराची घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या