Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedलोकसभेसाठी ४५ तर विधानसभेत २०० चे लक्ष्य

लोकसभेसाठी ४५ तर विधानसभेत २०० चे लक्ष्य

औरंगाबाद – aurangabad

लोकसभेत ४५ अधिक आणि विधानसभा निवडणुकीत (election) शिंदे गट व भाजपचे (bjp) मिळून २०० हून अधिक जागांवर विजय मिळविणे, हे लक्ष्य असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. लोकसभेप्रमाणे ९८ विधानसभा मतदारसंघातही राज्यातील मंत्री दौरा करणार आहेत. निवडणुकीसाठी सदैव तयार असल्याचेही त्यांनी सांगतानाच मंत्रिपदावरन कोणी नाराज नाही, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी नमूद केले.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द विचार करून बोलले पाहिजे. भाजप नेते अमित शह यांच्याविषयी बोलणे म्हणजे सुर्याला दिवा दाखविण्याचा प्रकार आहे. शहा त्यांच्याविषयी कधीही बोलत नाही. नावाचा उल्लेख देखील करीत नाहीत, असे असतानाच शहा यांचे नाव घेऊन गेलेले काही वापस येणार नाही, असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मारला.

प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यावर प्रथमच शहरात दाखल झाले. या निमिताने पत्रकार भवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी सहकार मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, विक्रांत पाटील, चिटणीस प्रवीण घुगे, कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, अल्पसंख्याक आघाडीचे एजाज देशमुख, विजय औताडे, भगवान घडमोडे, राम बुधवंत आदी उपस्थित होते.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अशी राजकीय स्थिती उद्धव ठाकरे यांची एक दिवस होईल, अशी टीका करताना बावनकुळे म्हणाले कौ, शिंदे-फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या गतीने काम करत आहे. आगामी निवडणुका शिंदे यांची शिवसेना व भाजप एकत्रच लढविणार आहे. गेली अडीच वर्षे राज्यात सरकार अस्तित्वात नव्हते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे संघटना म्हणून आमची जबाबदारी आहे.

ठाकरे गटाबाबत बावनकुळे म्हणाले की, ठाकरे गटाचे मुंबईतील बॅनर पहा, त्यावर केवळ चार जणांची छायाचित्रे दिसतात. दोन-चार जण राहिले ते सांभाळून ठेवा नाही तर तेही शिंदे घेऊन जातील. दरम्यान, मराठवाडा विकास मंडळासह अन्य विभागाचे मंडळांना मुदतवाढ न देण्याचा आघाडी सरकारचा निर्णय दुर्दैवी होता असे सांगत त्यांनी राज्य सरकार हे मंडळ पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करतील, असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या