Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकोविडच्या संसर्गवाढीची शक्यता लक्षात घेऊन यंत्रणांनी सज्ज राहावे

कोविडच्या संसर्गवाढीची शक्यता लक्षात घेऊन यंत्रणांनी सज्ज राहावे

औरंगाबाद – Aurangabad

कोविड-19 च्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांचे आणि जनजागृतीचे प्रमाण वाढवावे तसेच जिल्ह्यातील कोवीडसाठी वाढवण्यात आलेल्या सर्व आरोग्य उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने जानेवारी पर्यंत सुरू ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतच्या  बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले,अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त संजय काळे,जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंझारे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, घाटीच्या औषध विभागाच्या डॉ. मिनाक्षी भट्ठाचार्य, सुक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या डॉ. ज्योती बजाज यांच्या सह इतर सर्व संबंधित उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण  यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग वाढीची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. जिल्हयाचा संसर्गाचा दर 15 ते 20 टक्के असून जोपर्यंत तो पाच टक्क्यांपेक्षा कमी होत नाही तोपर्यंत सखोल काळजी  घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोवीडसाठी वाढवण्यात आलेल्या सर्व आरोग्य उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने जानेवारी पर्यंत सुरू ठेवण्यात येतील. जिल्हाधिकारी कार्यालय,मनपा, जिल्हा परिषद कार्यालय येथे येणाऱ्या सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यास सुरुवात करावी. कोरोना तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेत आढळून आलेल्या विविध आजारांची लक्षणे असलेल्या 92878 जणांचा रूग्ण निहाय पाठपुरावा करून अद्ययावत माहिती ठेवावी. जिल्ह्यातील संसर्गचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत.त्यादृष्टीने आरोग्य तपासण्यांसाठी सर्वांनी नियोजन करून तपासणी शिबिरे आयोजित करावीत.कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवावे, त्याचा सर्व समन्वय घाटीतून केल्या जाईल. तसेच जिल्हयात लिक्वीड ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्यासाठी अन्न औषध प्रशासन विभागाने संबंधिताकडे पाठपुरावा करून निर्मिती सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.त्याचप्रमाणे संसर्ग वाढीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन खासगी रुग्णालयांनी विभागीय आयुक्त यांच्या निर्दैशानुसार वाढीव खाटांची तयारी ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. 

तसेच कोवीड उपचारासाठीच्या सर्व अत्यावश्यक सुविधा सज्ज ठेवाव्या. रेमडीसीवीरची पुरेशी उपलब्धता ठेवण्यासाठी घाटी, मनपा, जिल्हा रुग्णालय यांनी समन्वय ठेवून इंजेक्शन उपलब्ध ठेवावे. कोवीड उपचार पद्धती बाबतचे   प्रशिक्षण डॉक्टर, नर्सेस, यांच्या सह पॅरामेडीकल स्टाफला देण्याचे नियोजन घाटीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या