Monday, April 29, 2024
HomeUncategorizedहर्नियावर उपचार करणारा सर्जन महत्त्वाचा

हर्नियावर उपचार करणारा सर्जन महत्त्वाचा

औरंगाबाद – aurangabad

हर्निया (Hernia)  जुना रोग असून त्यावर पूर्वीपासून उपचार केले जात आहेत. आज या क्षेत्रात लप्रोस्कोपी (Laparoscopy) आणि रोबोटीक्स तंत्रज्ञान (Robotics technology) आले असले तरी ग्रामीण भागात आपल्या परीने रूग्णांचे निदान करणारा डॉक्टरही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानानेे परिपूर्ण करतांनाच प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने औरंगाबादसारख्या टीयर-३ शहरात आयोजित राष्ट्रीय परिषद महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा विश्वास ‘हर्निया सोसायटी ऑफ इंडिया’ चे संस्थापक पद्मश्री डॉ. प्रदीप चौबे (Dr. Pradeep Choubey) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

“हर्निया सोसायटी ऑफ इंडिया’ ही देशभरातील हर्निया तज्ञांची संघटना असून याची १५ वी राष्ट्रीय परिषद औरंगाबादमध्ये आयोजन करण्यात आली अाहे. औरंगाबादला तिसऱ्यांदा राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवण्याचा मान मिळाला आहे. औरंगाबाद सर्जिकल सोसायटी, कृपामयी हॉस्पिटल आणि सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल या परिषदेचे आयोजक आहेत. शुक्रवारी हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये डॉ.प्रदीप चौबे यांच्या हस्ते डिजीटल द्विप प्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी डॉ.राजेश खुल्लर, सोसायटीचे मावळते अध्यक्ष रमेश अग्रवाला, डॉ. दीपराज भांडारकर, ऑर्गनायझिंग चेअरमन डॉ. विजय बोरगांवकर, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. निखिल चव्हाण, सचिव डॉ. नारायण सानप आणि एमसीआयचे निरीक्षक डॉ.संतोष रंजलकर यांची उपस्थिती होती.

परिषदेच्या सुरूवातीला औरंगाबादचे ऐतिहासीक महत्त्व सांगणारी एक शॉर्टफिल्म दाखविण्यात आली. डॉ.विजय बोरगावकर यांनी स्वागतपर भाषणात परिषदेच्या अायोजनाची भूमिका मांडली. डॉ.चोबे म्हणाले, अशा आयोजनांमुळे हर्निया क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत होत असून ते रूग्णांसाठी वरदान ठरते. डाॅ.भांडारकर म्हणाले, गेली दोन वर्षे ऑनलाईन पद्धतीने माहितीची देवाण-घेवाण सुरू होती. डॉ.बोरगावकर यांनी मोठ्या धाडसाने आॅफलाईन परिषदेचे आयोेजन करून ही संधी उपलब्ध करून दिली. डॉ.खुल्लर यांनीही उत्कृष्ट आयोजनाबाबत औरंगाबादच्या टीमचे अभिनंदन केले. डॉ.निखिल चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. यानंतर दिवसभर तज्ञांची भाषणे, पॅनल डिस्कर्शन आणि चर्चासत्रातून विविध विषयांवर मंथन झाले. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत हे आयोजन करण्यात आले. हर्नियावरील शस्त्रक्रियेशी संबंधित उत्पादनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनलाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या