महाराष्ट्र स्टार्टअप, नाविन्यता यात्रेचा शुभारंभ

महाराष्ट्र स्टार्टअप, नाविन्यता यात्रेचा शुभारंभ

औरंगाबाद - aurangabad

कौशल्य, रोजगार, उद्योजकता (Skills, Employment, Entrepreneurship) व नाविन्यता विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप (Maharashtra Startup) व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ आज रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Minister Sandipan Bhumre)यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Divisional Commissioner Sunil Kendrakar), जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan), कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाचे उपायुक्त सु.द.सैदाणे, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबईचे हिनेन गांधी, भोगे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता माहिती केंद्र औरंगाबादचे सहायक आयुक्त सुरेश वराडे तसेच संबंधित इतर अधिकारी व मान्यवर यांची उपस्थिती होती.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे स्वातंत्र्य दिनी या यात्रेचा शुभारंभ करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत तळागाळातील व ग्रामीण दुर्गम भागातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, तसेच नवउद्योजकांना प्रोत्साहन देऊन तज्ज्ञ मार्गदर्शन निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. त्यासेाबतच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यावर या यात्रेच्या माध्यमातनू भर देण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व जनतेपर्यंत या यात्रेचा उद्देश पोहचविण्यासाठी व्यापक स्तरावर प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत् जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर आणि सादरीकरण सत्र, राज्यस्तरीय सादरीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सदर यात्रेत सहभागी होण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची कुठलीही अट नाही. कृषी, शिक्षण, आरोग्य शाश्वत विकास, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा, इत्यादी क्षेत्रातील नवसंकल्पना असणे आवश्यक आहे. या यात्रेच्या ठिकाणी सहभागधारकास सहभाग घेण्यासाठी आपली नोंदणी करता येईल तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेच्या पोर्टलवर आणि सादरीकरणाच्या ठिकाणीही नोंदणी करता येईल.

यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात 23 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान विविध तालुक्यात भेट देणार आहे. 26 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, मॅजिक इंक्युबॅशन सेंटर आणि डॉ.बा.आं. मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी भेट देणार आहे,

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com