शंभूराजांचा जाज्वल्य इतिहास ऐकून औरंगाबादकर तृप्त!

शंभूराजे महोत्सवाला थाटात सुरुवात 
शंभूराजांचा जाज्वल्य इतिहास ऐकून औरंगाबादकर तृप्त!

औरंगाबाद- aurangabad

जय महाराष्ट्र हे बोल ऐकूनि हादरे जुल्मी तख्त, 

रणी पेटून उठती स्वातंत्र्याचे भक्त, 

हृदयात भडकते आग, उसळते रक्त, 

मरणास लावुनि लळा, होती आसक्त, 

ही भाप डफावर पडे, शब्द रांगडे, 

गाती पोवाडे जागती प्रेतं'', 

अशा जाज्वल्य पोवाड्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित (Shambhuraje Festival) शंभूराजे महोत्सवास गुरुवारी सायंकाळी सुरुवात झाली. एकापेक्षा एक पोवाड्यांच्या सादरीकरांनी औरंगाबादवासीयांचे स्फुरण भरून आले.

शंभूराजांचा जाज्वल्य इतिहास ऐकून औरंगाबादकर तृप्त!
Accident चार वाहनांच्या विचित्र अपघातात पाच जण ठार ; सहा जखमी

त्यानंतर त्यांनी

कडाडले नभोमंडळ, उसळला जाळ,

प्रकोपला काळ, सह्यगिरीतून उठला लाव्हा,

ज्वालामुखीतून भडके वणवा, जन्मला सिंहापोटी छावा... जी''

कोटीसूर्य हाती पिळून, तेज कोळून,

अर्क गाळून, बनवला असेल ज्याचा देह,

शंभू साक्षात अग्नीदाह, विजेचा जिवंत प्रवाह... जी''

शिवाजीचा पराक्रमी पुत्र, असून तरी मात्र सूर्यावर रात्र,

करीतसे शतकानूशतके राज, भाकडकथांना चढलाय माज,

दडपला सत्याचाही आवाज... जी,

म्हणतात शंभू छंदिष्ट, स्वभावचि दुष्ट,

बहू हू कोपिष्ट, शतकानूशतके किती प्रवाद... जी''

या एकापेक्षा एक पोवाड्यांचे सादरीकरण करत रसिक श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले.

महोत्सवाच्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले. तेथे छत्रपती शिवराय, शंभूराजे, शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेब यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी शिवसेनाप्रमुखांनी या शहराला संभाजीनगर असे नाव ठेवलेल्या या नगरीत शंभूराजे महोत्सव हा सर्वांचा महोत्सव होईल. येणाऱ्या काळात दरवर्षी अशा प्रकारचे आयोजन करण्याची हमी देतो, असे सांगितले. 'निजामाची औलाद जर शहराचे वातावरण खराब करणार असेल तर हिंदू बांधव ते खपवून घेणार नाही', असा इशारा त्यांनी दिला.

माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, शंभूराज्यांच्या नावाने हा महोत्सव संभाजीनगरामध्ये साजरा होतो ही अभिमानाची बाब आहे. संभाजी महाराजांनी १२५ लढाया लढल्या आणि सर्वच्य सर्व जिंकल्या. असा पराक्रम करणारा हा भूतलावरील एकमेव राजा आहे. शरणागती न पत्करता स्वाभिमानाने मृत्यूला कवटाळले अशा शंभूराजांचे पराक्रम अंगिकरून त्यांच्या नंतर महाराज राजाराम आणि महाराणी ताराराणी यांनी कारभार स्वाभिमानाने चालवला. या सर्वांचे बलिदान लक्षात घेऊन त्यांच्या जाज्वल्य इतिहास या महोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेने जनतेसाठी पुढे अमाप आहे याबद्दल त्यांनी आमदार दानवे यांचे कौतुक केले.

महोत्सवाचे उदघाटक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, संभाजीराजे हे खऱ्या अर्थाने शेतकरी होते, त्यांनी सर्वप्रथम शेतीवरील कर माफ केला. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भाविकांना पालखी पंढरपूरकडे नेण्यासाठी मदत केली आणि औरंग्याच्या वारकऱ्यांची कत्तल करण्याचे मनसुबे उधळून लावले. त्याच औरंग्याच्या कबरीवर काही लोक आज जाऊन आले. शिवसेना संपवायची भाषा बोलू लागले पण शहरातील नागरिकांनी घाबरायचे नाही कारण शिवसेना कधी संपणार नाही. शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. पण शहराचा पाणीपुरवठा विस्कटले असल्याची कारस्थाने करून पाण्याचे वॉल उघडणारे कर्मचारी त्यांनी फितूर केले. त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आदेश दिला. या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल त्यांनी आमदार अंबादास दानवे यांचे कौतुक केले.

आज ''गंध मराठी मातीचा''चे सादरीकरण

दरम्यान, छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवाचा दुसरा दिवस तितकाच दमदार असणार आहे. महाराष्ट्राच्या लोककलेचे प्रदर्शन करणाऱ्या 'गंध मराठी मातीचा' हा आरती क्रिएशननिर्मित कार्यक्रम शुक्रवारी (१३ मे) सायंकाळी साडेसहा वाजता सादर होणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. कलाश्री अकादमी या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील.

टीव्ही सेंटर हडको येथील छत्रपती संभाजीराजे मैदानावर आयोजित तीन दिवसीय शंभूराजे महोत्सवाचे उदघाटन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडले यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी, मान्यवरांनी टीव्ही सेंटर चौकातील अश्वारूढ छत्रपती संभाजीराजेंच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, सहसंपर्क संघटक सुनिता देव, समन्वयक कला ओझा, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, गणू पांडे, संतोष जेजुरकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, उपशहरप्रमुख संदेश कवडे, अनिल जैस्वाल, सुरेश कर्डिले, रघुनाथ शिंदे, माजी नगरसेवक राजू इंगळे,मोहन मेघावाले, युवासेना शहर चिटणीस धर्मराज दानवे आदींची उपस्थिती होती. महोत्सवाचे संयोजक-आयोजक आमदार अंबादास दानवे प्रास्ताविकपर संबोधनात तीन दिवसीय महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू विशद केला. शंभूराजे पोवाडा नाट्याची सुरुवात शाहिरी पोवाडा कलामंचाचे शाहीर रंगराव पाटील (शाहीर शमशेर, कोल्हापूर) यांनी पारंपरिक गण सादर करून केली. 'गजानना करू वंदना गौरी नंदना, देई प्रेरणा मंगलकार्या'ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मुद्रा सादर करताना

यश कीर्तीचा दिघंतात डंका ज्याचा वाजतो,मंगलमय तेजोमय देशा आधी तुला वंदितो'' गाताच उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गडगडाटात प्रतिसाद दिला. त्यानंतर महाराष्ट्राचा पोवाडा सादर करताना

जय महाराष्ट्र हे बोल ऐकूनि, हादरे जुल्मी तख्त,

रणी पेटून उठती स्वातंत्र्याचे भक्त,

हृदयात भडकते आग, उसळते रक्त''

हे गीत सादर केले. शाहीर युवराज पाटील (कोल्हापूर) लिखित या पोवाड्यांना तसेच गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. गेल्या ३५ वर्षांपासून छत्रपती संभाजीराजेंवर देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोवाडे व गीते सादर केलेली आहेत.

प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले. तेथे छत्रपती शिवराय, शंभूराजे, शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेब यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी शिवसेनाप्रमुखांनी या शहराला संभाजीनगर असे नाव ठेवलेल्या या नगरीत शंभूराजे महोत्सव हा सर्वांचा महोत्सव होईल. येणाऱ्या काळात दरवर्षी अशा प्रकारचे आयोजन करण्याची हमी देतो, असे सांगितले. 'निजामाची औलाद जर शहराचे वातावरण खराब करणार असेल तर हिंदू बांधव ते खपवून घेणार नाही', असा इशारा त्यांनी दिला. माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, शंभूराज्यांच्या नावाने हा महोत्सव संभाजीनगरामध्ये साजरा होतो ही अभिमानाची बाब आहे. संभाजी महाराजांनी १२५ लढाया लढल्या आणि सर्वच्य सर्व जिंकल्या. असा पराक्रम करणारा हा भूतलावरील एकमेव राजा आहे. शरणागती न पत्करता स्वाभिमानाने मृत्यूला कवटाळले अशा शंभूराजांचे पराक्रम अंगिकरून त्यांच्या नंतर महाराज राजाराम आणि महाराणी ताराराणी यांनी कारभार स्वाभिमानाने चालवला. या सर्वांचे बलिदान लक्षात घेऊन  त्यांच्या जाज्वल्य इतिहास या महोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेने जनतेसाठी पुढे अमाप आहे याबद्दल त्यांनी आमदार दानवे यांचे कौतुक केले. महोत्सवाचे उदघाटक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, संभाजीराजे हे खऱ्या अर्थाने शेतकरी होते, त्यांनी सर्वप्रथम शेतीवरील कर माफ केला. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भाविकांना पालखी पंढरपूरकडे नेण्यासाठी मदत केली आणि औरंग्याच्या वारकऱ्यांची कत्तल करण्याचे मनसुबे उधळून लावले. त्याच औरंग्याच्या कबरीवर काही लोक आज जाऊन आले. शिवसेना संपवायची भाषा बोलू लागले पण शहरातील नागरिकांनी घाबरायचे नाही कारण शिवसेना कधी संपणार नाही. शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. पण शहराचा पाणीपुरवठा विस्कटले असल्याची कारस्थाने करून पाण्याचे वॉल उघडणारे कर्मचारी त्यांनी फितूर केले. त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आदेश दिला. या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल त्यांनी आमदार अंबादास दानवे यांचे कौतुक केले. आज ''गंध मराठी मातीचा''चे सादरीकरण दरम्यान, छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवाचा दुसरा दिवस तितकाच दमदार असणार आहे. महाराष्ट्राच्या लोककलेचे प्रदर्शन करणाऱ्या 'गंध मराठी मातीचा' हा आरती क्रिएशननिर्मित कार्यक्रम शुक्रवारी (१३ मे) सायंकाळी साडेसहा वाजता सादर होणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. कलाश्री अकादमी या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील.

Related Stories

No stories found.