Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमहावितरणच्या बक्षीस योजनेस मिळतोय प्रतिसाद

महावितरणच्या बक्षीस योजनेस मिळतोय प्रतिसाद

औरंगाबाद – aurangabad

ग्राहकांना वेळेत आणि नियमित (electricity bill) वीज बिले भरण्याची सवय लागावी, यासाठी (mseb) महावितरणने सुरू केलेली बक्षीस योजना ऑगस्ट महिन्यातही राबविली जाणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना पुन्हा एकदा बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या बक्षीस योजनेला गेल्या महिन्यात उदंड प्रतिसाद मिळाला होता. २३८ जणांनी यात बक्षीस पटकावले होते. या बक्षीस योजनेमुळे महावितरणच्या महसुलात वाढ झाली होती. दरम्यान, वीज ग्राहकांसाठी असलेल्या बक्षीस योजनेत जुलेची सोडत १० ऑगस्टला तर ऑगस्टची सोडत १० सप्टेंबरला काढण्यात येणार आहे. मराठवाड्यातील १०१ उपविभागांतून हजार रुपयांपर्यंतची प्रत्येकी २ बक्षिसे वस्तू स्वरूपात दिली जाणार आहेत. त्यातील एक बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणाऱया ग्राहकास व दुसरे बक्षीस अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी राहणार आहे. यासोबतच दरमहा २२ विभागांतून प्रत्येकी एक मिक्सर ग्राइंडर किंवा त्या समकक्ष वस्तू, ९ मंडळांतून प्रत्येकी एक मोबाईल हॅण्डसेट किंवा टॅब्लेट, ३ परिमंडळांतून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे. प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून रेफ्रिजरेटरचे एक विशेष बक्षीस आहे. प्रादेशिक कार्यालय स्तरावरच इलेक्ट्रिक स्कूटरचे बंपर बक्षीस आहे.

३० ऑगस्टपर्यंत सुरू असलेल्या या योजनेचा मराठवाड्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांनी दरमहा वेळेवर वीज बिले भरून लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या