शिक्षक संघटनांमुळे शिक्षणाचा दर्जा खालावला-आ.प्रशांत बंब यांचा आरोप

शिक्षक संघटनांमुळे शिक्षणाचा दर्जा खालावला-आ.प्रशांत बंब यांचा आरोप

औरंगाबाद - aurangabad

शिक्षक संघटनांच्या दबावामुळे तसेच जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bomb) यांनी केला आहे. तसेच औरंगाबादेत काढण्यात आलेल्या शिक्षक सन्मान रॅलीमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी देखील आ.बंब यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे काम करणाऱ्या शिक्षकांनी मुख्यालयी थांबणे गरजचे असतांना देखील अनेक शिक्षक मुख्यालयी थांबत नाहीत. परंतु, मुख्यालयी थांबले असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून शासनाकडून आर्थिक लाभ घेतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोर-गरीबांची आणि मागासवर्गीय समाजातील मुले शिक्षण घेतात. त्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळविण्याचा हक्क असल्याचे आ.बंब यांनी यावेळी सांगितले. शिक्षक संघटनांच्या दबावामुळे शिक्षक आमदार करीत असल्याने दिवसेंदिवस शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे. विद्यार्थ्यांत गुणवत्ता घडविणे हे शिक्षकांचे काम असून जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक मंडळी ज्ञानदानाचे काम करण्याऐवजी राजकारण्यांच्या नादी लागत असल्याचे मोठे दुर्देव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, शिक्षण संस्था बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यात येत असून हे मी कदापिही होवू देणार नसल्याचे आ.बंब यांनी यावेळी सांगितले.शिक्षकांनी मोर्चा काढणे अत्यंत दुर्दैवाची बाब असून शिक्षकांनी काढलेल्या मोर्चाचा मी निषेध करतो. तसेच मोर्चा काढणाऱ्या शिक्षकांवर शासनाने शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी आ. प्रशांत बंब यांनी यावेळी केली. तसेच पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघ रद्द करण्यासाठी लवकरच केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

माझ्या मतदारसंघातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्यासाठी १० बाय १५ आकाराच्या खोल्या येत्या तीन महिन्यात उपलब्ध करून देतो, शिक्षकांनी त्या ठिकाणी राहण्यास येऊन ज्ञानार्जनाचे काम करावे, असे आ. प्रशांत बंब यांनी यावेळी सांगितले. तसेच आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. कपिल पाटील यांनी राज्यातील कोणत्याही २० शाळा निवडून त्याठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता तपासावी,असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com