Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedपुन्हा एकदा वसतिगृहे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू

पुन्हा एकदा वसतिगृहे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू

औरंगाबाद – aurangabad

कोरोना (corona) संसर्गाचा ओमायक्रॉन हा नवीन विषाणू सापडल्यामुळे सतर्क झालेल्या महापालिकेच्या यंत्रणेने येत्या काळात पुन्हा नव्याने (Covid Care Center) कोव्हिड केअर सेंटर सुरू करावे लागण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील काही कॉलेज व कार्यालयांशी संपर्क साधला आहे. गरज पडल्यास वसतीगृह ताब्यात घेतले जातील,त्यामुळे ते उपलब्ध करून द्या, असे कळविण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोना संसर्गाचा नवीन विषाणू सापडल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. रुग्णांची संख्या एकदम वाढली तर जास्त संख्येने कोव्हिड केअर सेंटर सुरू करावे लागतील. त्यामुळे करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्या ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते त्याच ठिकाणी आता नव्याने ते सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

किलेअर्क येथील समाजकल्याण विभागाचे वसतीगृह, एमआयटी कॉलेजचे वसतीगृह, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यलयाचे वसतीगृह कोव्हिड केअर सेंटरसाठी ताब्यात घेण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह त्या त्या कॉलेजच्या व्यवस्थापनाला या बद्दल कल्पना देण्यात आली. गरज पडल्यास वसतीगृह ताब्यात घेतले जातील, त्या दृष्टीने तयार रहा, असे कळविण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या