
मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)
पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रशासनाला घर बांधणीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांना नोकरीच्या ठिकाणी चांगली घरे मिळाल्यास पोलिसांची कार्यक्षमता वाढेल.
त्यासाठी चांगल्या सुविधांनी युक्त अशी जास्तीत जास्त घरे बांधण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
पोलिसांच्या घरांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ बंगल्यावर बुधवारी बैठक बोलविण्यात आली होती. यात महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंहामंडळाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडून नव्याने बांधण्यात येणाऱ्या घरांत चांगल्या सुविधा देण्याचे स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीत बोलताना गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या घरांचा प्रश्न किती बिकट आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात पोलिसांसाठी जितकी घरे दिली, त्या तुलनेत स्वातंत्र्यानंतरही तितकी घरे उपलब्ध करून देता आली नाहीत. त्यामुळे पोलीस मनुष्यबळाच्या तुलनेत निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर उद्धव ठाकरे यांनी पोलिसांची घरे उभारण्याबाबातचे आदेश दिले. पोलिसांसाठी नोकरीच्या ठिकाणी चांगली घरे मिळाल्यास पोलिसांची कार्यक्षमता वाढेल. त्यासाठी चांगल्या सुविधांनी युक्त अशी जास्तीत जास्त घरे बांधण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे भविष्यात पोलिसांना चांगली सुविधायुक्त घरे मिळणार आहेत.