नवरात्रात वाढणार प्रवाशांची संख्या

एसटीचे उत्पन्न वाढले
नवरात्रात वाढणार प्रवाशांची संख्या

औरंगाबाद - Aurangabad

मागील दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे मध्यवर्ती बसस्थाकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे गेल्या महामंडळाला दोनच दिवसांत 20 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार प्रमुख एस.ए. शिंदे यांनी दिली. या दोन दिवसांत 400 फेर्‍या मारत 43 हजार 357 किलोमीटरचे आंतर कापले आहे.

मागील आठवडयात सतत पाऊस पडत असल्याचा परिणाम एसटी प्रवासी सेवेवर झाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे एसटीनेप्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली होती. मुसळधार पावसामुळे अनेक मार्गावरील एसटीची वाहतूक बंद पडली होती. त्याचा फटका एसटी महामंडळाला बसला होता. 3 आणि 4 ऑक्टोबर या दोन दिवस पावसाने उघडीपी दिल्यामुळे

मध्यवर्ती बसस्थानकाला 20 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. या दोन दिवसाच्या कालावधीत मध्यवर्ती बसस्थानकातून विविध मार्गावर एसटी बसने जवळपास 400 फेर्‍या मारत 43 हजार 357 किलोमीटरचे आंतर कापले. या दरम्यान विविध ठिकाणी जळपास 20 हजार प्रवाशांनी एसटी बसने प्रवास केला. या प्रवासांतून मध्यवर्ती बसस्थानकाला 20 लाख 71 हजार 111 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर यात प्रवाशांची संख्याही जवळपास 45 ते 50 टक्केच्या दरम्यान

नवरात्री महोत्सवाला सुरूवात झाली असून बाहेरगावावरून येणार्‍या आणि शहरातून बाहेर जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठया प्रमाणात वाढते. त्यामुळे आगामी दिवसात पाऊस थांबला तर एसटीने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.