Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedगोवर संशयितांचा आकडा दोनशे पार!

गोवर संशयितांचा आकडा दोनशे पार!

औरंगाबाद – aurangabad

शहरातील वाढत्या गोवर साथीने आरोग्य विभागाची (Department of Health) चिंता वाढवली असून शनिवारी आणखी १४ संशयित बालके आढळून आली आहेत. आतापर्यंत एकूण २२४ संशयित बालके निघाल्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

शहरात गोवर साथीचा उद्रेक झाला आहे. गोवरची बालके मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्‍त केली आहे. आतापर्यंत गोवरची २२ बालके पॉझिटिव्ह निघाली आहेत. शुक्रवारी एकही पॉझिटिव्ह आढळला नाही, मात्र आणखी १४ संशयित बालके निघाल्यामुळे आरोग्य विभागासह शहरवासीयांची चिंता वाढली आहे. गोवरचा उद्रेक झालेल्या भागावर मनपा आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. यात शहरातील चिकलठाणा, नेहरूनगर, नारेगाव, मसनतपूर, पुंडलिक नगर, हर्ष नगर, हर्सूल या भागात गोवरचा उद्रेक झाला आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडून एमआर-१ चे १७ आणि एमआर-२ चे शुक्रवारी ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील १६५ बालकांना अतिरिक्‍त डोस देण्यात आले असून, आतापर्यंत एकूण २०२४ बालकांना डोस देण्यात आल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

आढळले सहा रुग्ण
मिसारवाडीत दोन, नारेगावमध्ये चार, औरंंगपुरा, जुना बाजार, भवानीनगर, गरम पाणी, कैसर कॉलनी, नेहरूनगर, बायजीपुरा (प्रत्येकी १) अशी १४ संशवित बालके आढळून आली. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या