औरंगाबादेत गोवर रुग्णांची संख्या वाढली ; आकडा दीडशे पार

औरंगाबादेत गोवर रुग्णांची संख्या वाढली ; आकडा दीडशे पार

औरंगाबाद - aurangabad

दिवसेंदिवस शहरात गोवर (Measles) साथीचा उद्रेक वाढत चालला आहे. आज शुक्रवारी आणखी ८ संशयित बालके आढळून आली असून, नेहरू नगर, भीम नगर, मसनतपूर, पुंडलिक नगर भागात गोवर साथीचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंत गोवरची लागण झालेल्या बालकांची संख्या दीडशे इतकी झाली आहे.

महिनाभरापासून शहरात गोवर साथीने थैमान घातले आहे. विविध भागात गोवर साथीचे बालके आढळून येत आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू करताच बालकांची संख्या वाढतच चालली आहे. चिकलठाणा, नेहरू नगर, विजयनगर, बायजीपुरा, भवानीनगर या पाच भागांत गोवरचा उद्रेक झाल्याचे आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. गोवर बालकांवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात असलेतरी त्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला कळविली जात आहे. यातील नवीन भागात आढळून येणाऱ्या गोवर बालकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथील हाफकीन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहेत. आतापर्यंत ४४ बालकांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यापैकी १७ बालके गोवर पॉझिटिव्हचे आढळून आले आहेत. 

प्रयोगशाळेकडून आणखी ३६ अहवाल येणे बाकी आहे. असे असतानाही शहरात गोवरची साथ अद्यापही आटोक्‍यात आलेली नाही. शुक्रवारी गोवरचे ८ संशयित बालके निघाली. त्यात पुंडलिक नगर २, नेहरू नगर ३, भीम नगर, मसनतपूर, छावणी या भागांत प्रत्येकी एक याप्रमाणे बालके आढळून आली आहेत. तसेच ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील २१६ बालकांचे लसीकरण करण्यात आले असून, एमआर-१चे २१ आणि एमआर-२ चे ३५ बालकांना डोस देण्यात आले आहेत. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com