Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदिलासादायक... औरंगाबादेत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 50 टक्क्यांनी घट

दिलासादायक… औरंगाबादेत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 50 टक्क्यांनी घट

औरंगाबाद – Aurangabad

मार्च महिन्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत औरंगाबाद शहरात सक्रिय रूग्णांच्या संख्येने चांगलीच भरारी घेतली होती. मार्च महिन्यात तब्बल 32 हजार कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली होती. मात्र प्रशासनाने प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या आणि महिनाभरातच रुग्णसंख्या निम्म्याने कमी करण्यात यश आले आहे. महिनाभरात शहरातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल 50 टक्क्यांनी घट झाली आहे.

- Advertisement -

फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने औरंगाबाद शहरात शिरकाव केला. मार्च महिना सुरू झाला आणि शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले.

रोजचे हजारपेक्षा अधिक बाधित आढळू लागल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला चांगलाच हादरा बसला. गतवर्षीपेक्षा यावेळी कोरोना रुग्णवाढीचे आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडत एकाच महिन्यात जिल्ल्यात तब्बल 32 हजार कोरोनाबाधित निघाले. त्यामुळे उपलब्ध बेड्स, आरोग्य सुविधा देखील अपुरा पडू लागल्याने रूग्णांचा ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता.

दरम्यान, केंद्रीय पथकाने औरंगाबाद शहरात येऊन येथील परिस्थितीचा आढावा घेत प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवले. कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला गती दिली. शहरात बाहेरून येणार्‍या प्रवाशांची विमानतळ, रेल्वेस्टेशन व शहरातील सहा एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचणी सुरू केली. त्यामुळे शहरात येणारे बाधित लगेच शोधून वाढत जाणारी संसर्गाची साखळी ब्रेक करण्यात प्रशासनाला यश येत आहे. मागील महिनाभरातच सक्रीय रुग्णांची संख्या 50 टक्क्यांनी घटली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या