औरंगाबादमधील 50 वसाहतींची जातीवाचक नावे बदलणार

प्रशासनाचा निर्णय
औरंगाबादमधील 50 वसाहतींची जातीवाचक नावे बदलणार

औरंगाबाद - Aurangabad

राज्य सरकारने (State Government) जातीवाचक गावांच्या नावांसह शहरे व वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिकेने शहरातील 50 वसाहतींची जातीवाचक नावे काढली असून ती बदलण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी वॉर्ड अधिकार्‍यांकरवी संबंधित वसाहतीमधील नागरिकांकडून नावे मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर वसाहतींची नावे बदलण्याचा निर्णय घेतला जाईल, असे (Deputy Commissioner Aparna Thete) उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार औरंगाबाद पालिकेने शहरातील जातीवाचक नावे बदलण्याची तयारी सुरू केली आहे. पालिका आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील वसाहती व रस्त्यांची जातीवाचक नावे काढण्यासाठी उपायुक्त अपर्णा थेटे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. या संदर्भात माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, शहरातील जातीवाचक वसाहती व रस्त्याची नावे शोधण्यासाठी वॉर्ड अधिकार्‍यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार वॉर्ड अधिकार्‍यांनी नावे कळवली आहेत. तसेच वॉर्डातील जातीवाचक नावे बदलण्यासाठी त्या भागातील नागरिकांकडून नावे मागवली जाणार आहेत. ही नावे प्राप्त झाल्यानंतर जाहीर प्रगटनाव्दारे नावांना प्रसिध्दी दिली जाईल. त्यानंतर वसाहतींची नावे बदलण्यात येतील, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी स्पष्ट केले.

या वॉर्डातील वसाहतींची नावे बदलणार

प्रभाग-1 : डिंबर गल्ली, ब्राम्हण गल्ली, कुंभार गल्ली, मल्लावपूरा, बेगमपूरा, भिल्ल गल्ली, भिमनगर, भंगीवाडा, मांगवाडा (भावसिंगपूरा गाव), चांभारवाडा (भिमनगर, भावसिंगपूरा गाव), बौध्दवाडा, मोमीनपूरा, लोटाकारंजा, माळीवाडा.

प्रभाग-2 : चेलीपूर्‍यातील धोबीघाट (काचीवाडा), नवाबपूरामधील तेलंगवाडा गवळीपूरा, राजाबाजारमधील बोहरी कठडा, गुलमंडीमधील जोहरीवाडा, कुंभारवाडा, रंगारगल्ली, नागेश्वरवाडीतील पारधीपूरा-भोईवाडा, औरंगपुर्‍यातील बौद्धवाडा (पैठणगेट), सिल्लेखान्यातील कैकाडीवाडा, समर्थनगरातील भोईवाडा.

प्रभाग-4 : मयूरपार्कमधील गोंधळवाडा, हर्सूल प्रभागातील धनगरगल्ली, सोनारगल्ली, ब्राम्हणगल्ली, मांगवाडा, कैकाडीगल्ली, चांभारगल्ली, एकतानगरातील चांभारगल्ली, कोळीवाडा, सोनारगल्ली.

प्रभाग-5 : नारेगावातील भाटनगर, पटेलनगर, चौधरी कॉलनीतील शहानगर, पटेलनगर.

प्रभाग-6 : चिकलठाण्याच्या कामगार कॉलनीतील खाटीक गल्ली (कुरेशी गल्ली) धनगरवाडा, साठेनगर (मांगवाडा) बौध्दवाडा, सुतार वाडा, माळी गल्ली, कुंभारवाडा, तेलीगल्ली, मुल्लागल्ली, ब्राम्हणगल्ली, चांभारवाडा.

प्रभाग-7 : बौध्दवाडा (गोधडीपूरा), भारतनगरातील वैदुवाडा (वैदु मंदिर).

प्रभाग-9 : बौध्दनगर.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com