Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअग्निवीर भरती ; धावताना तरुणाचा मृत्यू 

अग्निवीर भरती ; धावताना तरुणाचा मृत्यू 

औरंगाबाद – aurangabad

देशसेवा व घरची परिस्थिती सुधरावी म्हणून देशाच्या सैन्यात भरती (Military conscription) होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा भरतीमध्ये मैदानी चाचणी दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १८ ऑगस्ट रोजी घडली. करण नामदेव पवार (२०, रा शिरजापूर तांडा ता. कन्नड जि. औरंगाबाद) (Kannada District Aurangabad) असे मयत तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

अग्निवीर योजने (Agniveer Yojana) अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) मैदानामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. रात्री १२ वाजेच्या दरम्यान या भरतीप्रक्रियेत प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. करण व त्याचा लहान भाऊ सागर पवार हे त्यांच्या मित्रासमवेत या भरती प्रक्रियेसाठी शहरात हजर होते.

रात्री दोन वाजेच्या सुमारास करण हा सोळाशे मीटर धावण्याच्या मैदानी चाचणी दरम्यान करण धावत असताना चक्कर येऊन पडला. त्याला तेथील कर्मचारी व त्याचा भाऊ सागर यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले.

याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. करण व सागर हे दोघे सख्ये भाऊ घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सैन्य भरती दाखल व्हायचे ही जिद्द दोघा भावांमध्ये होती. १६०० मीटर दोघेही धावत होते. शेवटचा राऊंड असतानाचा करण चक्कर येऊन पडला. मोठ्या भावाला पडलेला बघूनही आपल्या जिद्दीमुळे करणला उचलता देखील आले नाही.

करणची आर्थिक परिस्थिती बेताची होती. आई सतत आजारी राहत असल्याने घरची सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्याचे वडील गावाशेजारी असलेल्या कंपनीत मजूर म्हणून काम करतात. आई-वडील आणि भावासाठी तो स्वतः स्वयंपाक करायचा. दरम्यान, सहा महिन्यापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले. आपण सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करावी, अशी त्याची इच्छा होती. तर गेली ६ वर्षे तो सतत यासाठी सराव करत होता. देशासाठीच प्राण गेले तरी बरे होईल असे नेहमी तो आपल्या मित्रांना सांगायचा. करण चक्कर येऊन पडल्याची माहिती मिळताच त्याचे जवळचे नातेवाईक कन्नडहून औरंगाबादमध्ये आले होते. मात्र गुरुवारी दुपारी त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच इतर नातेवाईक आणि मित्रपरिवार घाटी रुग्णालयात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या